Join us  

8 वर्ष मोठ्या रुमर्ड गर्लफ्रेंडने आर्यनला दिली फ्लाइंग किस; किंग खानच्या लेकाने दिली अशी रिॲक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 3:41 PM

Aryan khan: आर्यन त्याच्यापेक्षा ८ वर्षांनी मोठ्या असलेल्या ब्राझिलियन मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (shaharukh khan) एकेकाळी त्याच्या अभिनयामुळे आणि सुपरहिट सिनेमांमुळे चर्चेत यायला. परंतु, गेल्या काही काळात शाहरुख त्याच्या सुहाना (suhana khan) आणि आर्यन (aryan khan) या दोन मुलांमुळे चर्चेत येत आहे. यात सध्या आर्यनच्या लव्हलाइफची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होतीये. सोशल मीडियावर आर्यनचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर्यनची रुमर्ड ब्राझिलियन गर्लफ्रेंड त्याला फ्लाईंग किस देताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्यावर आर्यनने दिलेला रिप्लाय जास्त चर्चिला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आर्यनच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. आर्यन त्याच्यापेक्षा वयाने ८ वर्षांनी मोठ्या असलेल्या एका ब्राझिलियन मॉडेलला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्येच त्याचा आणि लारिसा बोन्सी हिचा एका पार्टीतील व्हिडीओ समोर आला आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आर्यन मार्टिन गॅरिक्स याच्यासोबत उभा असून या पार्टीमध्ये लारिसादेखील दिसत आहे. लारिसा एका गाण्यावर डान्स करत असून आर्यनला पाहिल्यानंतर ती त्याला फ्लाइंग किस देते. विशेष म्हणजे लारिसाने दिलेली फ्लाइंग किस पाहिल्यावर आर्यन लाजतो आणि गालातल्या गालात हसतो. हा व्हिडीओ reddit.com वर शेअर करण्यात आला आहे.

Another video of Aryan and Larissa at the Martin Garrix from the Martin Garrix Afterpartybyu/tarheel_123 inBollyBlindsNGossip

दरम्यान, अलिकडेच आर्यन आणि लारिसा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, याविषयी आर्यनने कोणतंही भाष्य केलेलं नाही. लारिसा ब्राझिलियन मॉडल असण्यासोबतच तिने हिंदी, तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :बॉलिवूडआर्यन खानशाहरुख खानसेलिब्रिटी