Join us  

Aryan Khan Drugs Case : बातमी वाचली तेव्हा मलाही...; आर्यन प्रकरणावरून खवळली ट्विंकल खन्ना, ‘स्क्विड गेम्स’शी केली तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 4:35 PM

Aryan Khan Drugs Case : चला देसी स्क्विड गेम्स सुरू करुया, असं म्हणत ट्विंकल खन्नाने पोस्ट शेअर केलीय.

ठळक मुद्देआज मुंबई विशेष न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता आर्यन खानच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय त्याच्या वकीलांनी घेतला आहे.

शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan ) सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणा-या क्रूझवर ( Aryan Khan Drugs Case) छापा टाकल्यानंतर एनसीबीने त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. आज आर्यनला जामीन फेटाळल्याने तुरूंगातील त्याचा मुक्काम आणखी वाढला आहे.  आर्यनच्या अटकेवर आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या. आता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)  हिनेही मौन सोडलंय. इन्स्टावर एक लांबलचक पोस्ट लिहून तिने आर्यन खानच्या केसची तुलना सध्या नेटफ्लिक्सवर गाजत असलेल्या ‘स्क्विड गेम्स’ (Squid Game) या वेब सीरिजमधील एका एपिसोडशी केली आहे.

ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॉगमधील काही भाग पोस्ट केलाय. 

ट्विंकल खन्ना म्हणते...‘या खेळात प्रत्येक खेळाडूला दहा मार्बल्स दिले जातात. तर विरुद्ध टीमसोबत स्पर्धा करत त्यांना मार्बल्स मिळवायचे आहेत. सर्वात दमदार खेळाडूला सर्वाधिक त्रास दिला जातो. जेणेकरून तो त्याचे सर्व मार्बल्स गमावून बसेल.  जेव्हा मी शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेची बातमी वाचली तेव्हा मलाही माझे मार्बल मिस झाल्यासारखं वाटलं. आर्यनकडे नाही तर त्याच्या मित्राकडे 6 ग्रॅम चरस सापडलं. रिपोर्टनुसार, आर्यन ड्रग्ज घेत होता, याचा काहीही पुरावा सापडलेला नाही. तरिही एक तरूण मुलगा 2 आठवड्यांपासून  तुरूंगात बंद आहे,’ असं ट्विंकल खन्नाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आर्यन प्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आर्यन व शाहरूखला पाठींबा दिला आहे. यात सुनील शेट्टी, हृतिक रोशन, रवीना टंडन, पूजा भट, जावेद अख्तर, सलमान खान अशा अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.दरम्यान आज मुंबई विशेष न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता आर्यन खानच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय त्याच्या वकीलांनी घेतला आहे. त्यामुळे आणखी काही काळासाठी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे.

टॅग्स :आर्यन खानट्विंकल खन्नामुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी