Join us  

Aryan Khan Drugs Case : आर्यन खान प्रकरणावर आमिर खान गप्प का? KRKनं सांगितली ‘अंदर की बात’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 3:57 PM

Aryan Khan Drugs Case : बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी शाहरूख खान व आर्यन खानला पाठींबा दिला. पण शाहरूखचा चांगला मित्र मानला जाणारा अभिनेता आमिर खान ( Aamir Khan) मात्र या प्रकरणावर मौन बाळगून आहे.

ठळक मुद्देकेआरकेच्या या ट्विटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) तुरूंगातील मुक्काम पुन्हा वाढला आहे. आज पुन्हा एकदा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आणि आर्यनचा तुरूंगातील मुक्काम वाढला. मुंबई क्रूझवरील ड्रग्ज पार्टी  प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) आर्यनला अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून तो जेलमध्ये आहे. साहजिकच बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. यादरम्यान बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी शाहरूख खान व आर्यन खानला पाठींबा दिला. जावेद अख्तर, सलमान खान, हृतिक रोशन, पूजा भट, पूजा बेदी असे एक ना अनेक स्टार्स शाहरूख व आर्यनच्या पाठीशी उभे राहिलेत. पण शाहरूखचा इंडस्ट्रीतला चांगला मित्र मानला जाणारा अभिनेता आमिर खान ( Aamir Khan) मात्र या प्रकरणावर अद्याप मौन बाळगून आहे. आमिर खानची चुप्पी शाहरूखच्या काही चाहत्यांना खटकते आहे. पण आता आमिरच्या या चुप्पीमागचं कारण समोर आलं आहे.केआरके (KRK)अर्थात कमाल आर खान याने एक ट्विट केलं आहे. आर्यन खान प्रकरणावर आमिर खाननं मौन का बागळून आहे, यामागचं कारण त्याने या ट्विटमध्ये सांगितलं आहे.

केआरके त्याच्या ट्विटमध्ये लिहितो, ‘आर्यन खान प्रकरणावर तू इतका शांत का? असं एका मित्रानं आमिरला विचारलं. यावर मी ना शाहरूखचा मित्र आहे, ना त्याचा शत्रू. या प्रकरणाशी माझं काहीही देणंघेणं नाही, असं उत्तर आमिरनं दिलं. खरं आहे, हाच बॉलिवूड परिवार आहे, हेच या बॉलिवूडचं वास्तव आहे.’केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये बॉलिवूडचा खरा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बॉलिवूड हे कुटुंब नाही तर केवळ बिझनेस आहे. कामापुरता मामा, असं या इंडस्ट्रीचं तत्त्व आहे, असा केआरकेचा सूर आहे.याच पार्श्वभूमीवर केआरकेने आणखी एक ट्विट केलं आहे. त्यात तो लिहितो, ‘साजिद नाडियाडवालाने कधीच शाहरूखसोबत काम केलं नाही. ना तो त्याचा मित्र आहे. पण तरिही तो किंगखानच्या घरी गेला आणि त्याचं दु:ख वाटून घेण्याचा प्रयत्न केला.’केआरकेच्या या ट्विटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :आर्यन खानआमिर खानशाहरुख खानकमाल आर खानमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी