Join us  

आर्यन प्रकरणानं शाहरूखचा ‘भाव’ पडला असं मानत असाल तर ‘पठान’साठी झालेली ‘डील’ बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 5:57 PM

रिलिजपूर्वीच इतक्या कोटींना विकला गेला Shah Rukh Khanचा ‘पठान’ व सलमान खानचा ‘टायगर 3’!!

किंगखान शाहरूख खानचा ( Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drug Case) अटक झाली आणि तब्बल 26 दिवस त्याला तुरुंगात काढावे लागले. या प्रकरणामुळे शाहरूखची इमेज खराब झाली,मार्केट व्हॅल्यू घटली, असं तुम्हाला वाटतं असेल तर तो तुमचा गैरसमज म्हणावा लागेल. होय, किमान किंगखानचा आगामी सिनेमा ‘पठान’च्या (Pathan ) स्ट्रिमिंग राईट्ससाठी झालेली डील बघून तरी असंच म्हणावं लागेल.

होय, शाहरुखचा ‘पठान’ आणि सलमान खानचा ( Salman Khan) ‘टायगर 3’  (Tiger 3) हे दोन्ही सिनेमे 200 कोटींना विकले गेले आहेत. ‘लेट्स ओटीटी ग्लोबल’ने एक ट्विट केलं आहे. या ट्विटनुसार,  अ‍ॅमेझॉन प्राईमने पठान आणि टायगर 3 चे पोस्ट थिएट्रिकल स्ट्रीमिंग राईट्स 200 कोटी रूपयांना खरेदी केले आहेत. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने या दोन्ही अ‍ॅक्शन थ्रीलर सिनेमासाठी यशराज फिल्म्ससोबत 8 आठवड्यांची विंडो डील केली आहे.

शाहरुखचा झिरो चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगलाच आपटला होता. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनंतर शाहरुखचा ‘पठान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. मात्र याऊपरही त्याची ब्रँड व्हॅल्यू खूप मोठी आहे. शाहरुख अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसतो.  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्याचा मोठा फटका शाहरुखनच्या ब्रँड व्हॅल्यूला बसणार, अशी शक्यता वर्तवली गेली होती. काही प्रमाणात ती खरीही म्हणता येईल. पण म्हणून या प्रकरणानं किंगखान ‘संपणार’, अशी शक्यता जाणकारांनी फेटाळून लावली आहे. शाहरुखची ब्रँड व्हॅल्यू 378 कोटी रुपये आहे. किंग खान सध्या 40 ब्रँड्सचं प्रमोशन करतो. प्रत्येक ब्रँडकडून शाहरुखला 4 कोटी रुपये मिळतात. 

गेल्या काही दिवसांपासून शाहरुखचा ‘पठान’ तर सलमानचा ‘टायगर 3’ हे दोन्ही सिनेमे चर्चेत आहे. चाहते गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या दोन्ही चित्रपटांची वाट पाहत आहे.   सलमानच्या ‘टायगर 3’ मध्ये कतरिना मुख्य अभिनेत्री आहे.  हा 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर शाहरूखच्या ‘पठाण’मध्ये दीपिका पादुकोण व जॉन अब्राहम हे मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :शाहरुख खानआर्यन खानसलमान खानमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी