Join us  

आर्या आंबेकरला चित्रपटानंतर मालिकेत करायचंय काम, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 6:34 PM

Arya Ambekar:आर्या आंबेकरने नुकतीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत संवाद साधताना एक इच्छा व्यक्त केली.

प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर (Arya Ambekar) नेहमीच आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असते. आर्याने आजवर अनेक गाणी गायली आहेत. गायनासोबतच आर्याने ती सध्या काय करते या सिनेमातून एक अभिनेत्री म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे.  या सिनेमानंतर आता आर्याला मालिकांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. आर्या नुकतीच तिच्या फॅन्ससोबत आस्क मी ए क्वेशन हा गेम खेळत होती. यावेळी तिने तिची ही इच्छा व्यक्त केली आहे. 

एका चाहत्याने तिला, अनेक मालिकांचे शिर्षक गीत गायले आहेस. मालिकेत मुख्य भूमिका ऑफर झाली तर साकारशील का? असा प्रश्न विचारला.  त्यावर आर्याने, याबद्दल फार कधी विचार केला नाही. पण मला एका लग्नाची दुसरी गोष्ट सारखी मालिका करायला नक्कीच आवडेल असं उत्तर दिले.  पुढे तिने सतीश राजवाडे यांना ही टॅग केले. तसेच आणखी एका चाहत्याने पुन्हा एकदा सोज्वळ भूमिका करायला आवडेल की ग्रे शेडड? असा प्रश्न विचारलाय. त्यावर उत्तर देत आर्याने, सालस, सोज्वळ ऑलवेज! असे म्हटले. त्यामुळे आता आर्या मालिकेत झळकणारे का असा प्रश्न फॅन्सना पडलाय. तसेच तिला मालिकेत पाहण्यासाठी चाहते बरेच उत्सुकही आहेत.  

आर्या आंबेकर सारेगमपमुळे घराघरात पोहचली. काही दिवसांपूर्वीच ती सारेगमप लिटील चॅम्प्सची परीक्षक म्हणून सर्वांसमोर आली. एका चाहत्याने तिला याबाबतही प्रश्न विचारलाय.  ज्या स्पर्धेने ओळख दिली त्याच स्पर्धेचं परिक्षण करतानाचा अनुभव कसा होता? असा प्रश्न एका चाहत्याने विचारलाय. त्यावर आर्याने, “ परिक्षण बनण्याची ही संपूर्ण जर्नी माझ्यासाठी एक लर्निंग एक्सपेरिएन्स होता. लहान मुलांना, त्यांच्या त्या वेळच्या मनस्थितीला समजून घेणं, त्यांना कळेल अशा भाषेत समजावून सांगणं, त्यांना सोपं जाईल असं शिकवणं.... हे आणि बरचं काही...यातून आम्ही सगळे सुद्धा खुप काही शिकलो. तसेच हेही कळलं की आम्ही ज्यावेळी स्पर्धक होतो त्यावेळी आमचे परिक्षक अवधूत गुप्ते दादा आणि वैशाली सामंत ताई यांनी किती कठीण गेलं असेल.” असं उत्तर दिले. 

टॅग्स :आर्या आंबेकर