Join us

कलाकारांकडून मॅन्चेस्टर एरिना हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 16:03 IST

ब्रिटनमधील मँचेस्टर एरिनात प्रसिद्ध गायिका अरियाना ग्रॅण्ड हिच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण हल्ल्याचा निषेध सगळीकडूनच केला जातो आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.23- ब्रिटनमधील मँचेस्टर एरिनात प्रसिद्ध गायिका अरियाना ग्रॅण्ड हिच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण हल्ल्याचा निषेध सगळीकडूनच केला जातो आहे. कलाकारांकडूनसुद्धा या हल्ल्यावर प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अरियाना ग्रॅण्ड तसंच तीचा कॉन्सर्ट बघायला गेलेल्या हजारो लोकांचं सांत्वन केलं आहे. ट्विटरवरून प्रियांका चोप्रा हिनं ही प्रतिक्रिया दिली आहे. ""माझे विचार आणि प्रार्थना अरियाना ग्रॅण्ड व हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांसोबत आहेत. या जगात काय सुरू आहे"?, असं ट्विट प्रियांकाने केलं आहे.

 

प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट हिने मॅन्चेस्टर हल्ल्यावर मतं मांडलं आहे. माझे विचार, प्रार्थना आणि अश्रु मॅन्चेस्टर हल्ल्यातील पीडितांबरोबर आहेत. असं टेलर स्विफ्चनं म्हटलं आहे.

गायक ब्रुनो मार्स यानेही या संपूर्ण हल्ल्याचा निषेध ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. आपण ज्या जगात राहतो आहे ते जग इतकं क्रुर असेल यावर विश्वास बसत नाही आहे. मॅन्चेस्टरमध्ये जे घडलं त्याबद्दल मी अत्यंत दुःखी झालो आहे.

गायक हॅरी स्टाइल्स यानेसुद्धा मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यासंदर्भात ट्विट केलं आहे. मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या हल्ल्याचं अतिशय दुःख आहे.. तिथल्या सगळ्या लोकांसाठी माझ्या प्रार्थना.

सोमवारी रात्री कॉन्सर्टमध्ये हल्ला झाल्यानंतर अरियाना ग्रँडने खंत व्यक्त केली. मी मनातून पार कोसळून गेलेय, मी तुमची माफी मागते. व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नाहीयत अशा शब्दात अरियानाने तिच्या टि्वटर अकांउटवर आपले दु:ख व्यक्त केले. अरियाना ग्रँडच्या पॉप कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला असून, 50 जण जखमी झाले आहेत.