Join us  

"बाई नाही पुरुषच दिसतेस" नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली अर्चना पूरन सिंह, म्हणाली, 'अशिक्षित...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 8:50 AM

अर्चना पूरन सिंहने इन्स्टाग्रामवर पती परमित सेठीसोबत एक जुना फोटो शेअर केला.

आपल्या भारदस्त आवाजाने आणि हसण्याने लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री अर्चना पूरन सिंह (Archana Pooran Singh). तिला अनेकदा दिसण्यावरुन आणि आवाजावरुन ट्रोल केले जाते. अर्चना गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत आहे. कपिल शर्मा शो मध्ये ती गेस्ट म्हणून दिसते. याशिवाय ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे.कधी पती परमित सेठीसोबत कधी मुलांसोबत तर कधी घरकाम करणाऱ्या भाग्यश्रीसोबत तिचे व्हिडिओ व्हयरल होत असतात.  नुकताच तिने एक जुना फोटो शेअर केला ज्यावर एका नेटकऱ्याने अतिशय अपमानकारक कमेंट केली आहे. त्या नेटकऱ्याला अर्चना रोखठोक प्रत्युत्तर दिलंय.

अर्चना पूरण सिंहने इन्स्टाग्रामवर पती परमित सेठीसोबत एक जुना फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'गुगल मला नेहमी असे फोटो दाखवत आयुष्य किती सुंदर आहे याची जाणीव करुन देतं.' या फोटोवर एकाने कमेंट करत लिहिले, 'एका माणसासोबत दुसरा माणूस' तर आणखी एकाने लिहिले, 'एकाच फ्रेममध्ये दोन मर्द' तर एका महिला नेटकऱ्याने लिहिले, 'बाई कमी पुरुषच जास्त दिसते. कपिल बरोबर म्हणतो खूप वेळ लागला असणार तुला रुप परिवर्तन करायला'.

अशा कमेंट्स अर्चनाचा राग अनावर झाला. तिथे थेट उत्तर देत लिहिले, 'एवढ्या कमी वयात किती घाणेरडे विचार आहेत तुझे. जरा शिक्षण घेतलं असतंस तर मोठ्यांशी कसं वागायचं ते लक्षात आलं असतं तुझ्या. सगळ्या वयाच्या, वजनाच्या महिलांचा आदर करायला शिक. तू जर इतर महिलांचाच आदर करु शकत नसशील तर इतर पुरुषांकडून आदराची कशी अपेक्षा करु शकतेस.'

अर्चनाला कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी पाठिंबा दिला. 'आम्ही तुझ्यासोबत आहोत' असं म्हणत तिची बाजू घेतली. 'तू खूप सुंदर आहेस. तू अनेकांना हसवतेस. तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना.' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

टॅग्स :अर्चना पूरण सिंगसोशल मीडियाट्रोलकपिल शर्मा