Join us

ए आर रेहमान यांना ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर

By admin | Updated: October 8, 2015 14:18 IST

ख्यातनाम संगीतकार ए आर रेहमान यांना ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला असून २६ ऑक्टोबररोजी सुभाष घई यांच्याहस्ते रेहमानला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ८ - ख्यातनाम संगीतकार ए आर रेहमान यांना ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला असून २६ ऑक्टोबररोजी सुभाष घई यांच्याहस्ते रेहमानला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 
पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त 'ह्रदयनाथ मंगेशकर' हा पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये व सन्माचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून आत्तापर्यंत हा पुरस्कार लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाताई यांना हा पुरस्कार मिळाला आहे. २६ ऑक्टोबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.