ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10- अभिनेत्री अनुष्का शर्माच्या "परी" या सिनेमाचं दुसरं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सोमवारी अनुष्काने या सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज केलं. तसंच सिनेमाची रिलीज डेटचीही घोषणा केली आहे. 9 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमाचं नाव आकर्षक असलं, तरी पहिलं आणि दुसरं ही दोन्ही पोस्टर्स भीतिदायक आहेत.
सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये अनुष्काचा थ्रिल अंदाज बघायला मिळाला होता. आत्तापर्यंतच्या तिच्या लूकपैकी सगळ्यात वेगळ्या लूकमध्ये अनुष्का दिसली होती. सिनेमाच्या या दुसऱ्या पोस्टरमधूनही तशीच छटा पहायला मिळते आहे. पोस्टरमध्ये अनुष्का कानात हेडफोन्स घालून गाणी ऐकत जमीनीवर पडलेली बघायला मिळते आहे. दोन पडद्यांच्यामध्ये वरच्या दिशेने हात करत ती जमीनीवर पडली आहे. तिच्या डोळ्यातून ती काहीतरी विचार करत असल्याचं बघायला मिळतं आहे. तसंच तिच्या पायावर बांधून ठेवल्यासारख्या खूणा बघायला मिळत आहेत. तिला खूप वर्षापासून कोणतरी बांधून ठेवलं असावं, असं त्या खुणेवरून समजतं आहे. "परी" असं नाव असलेला हा सिनेमा हॉरर आहे की थ्रिलर हे ओळखणही कठीण झालं आहे. प्रोसित रॉय या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसचा "परी" हा तिसरा सिनेमा आहे. याआधी "एनएच 10", आणि "फिलौरी" या दोन सिनेमांची निर्मिती तीच्या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. "एनएच 10" या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती.
आणखी वाचा
सिद्धार्थ-जॅकलिनचा लिपलॉक करतानाचा फोटो झाला व्हायरल
अंकुश दिसणार ‘या’ भूमिकेत
बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रींचे मानधन आहे सर्वाधिक !
अनुष्का शर्मानं आपल्या "परी" सिनेमाचा फर्स्ट लूक जूनमध्ये रिलीज केला होता. पोस्टरमध्ये असलेले निळ्या बॅकग्राऊंडवरचे अनुष्काचे निळे डोळे काही प्रश्न विचारतात. तिच्या चेहऱ्यावरही जखमेची खूण आहे. "फिलौरी"मध्ये अनुष्काने भूताची व्यक्तिरेखा साकारली होती. आता या सिनेमात नक्की काय आहे, याची उत्सुकता आहे. या सिनेमात अनुष्कासोबत परमब्रता चॅटर्जी आहे. "कहानी"मध्ये त्याची भूमिका होती.
सध्या अनुष्का शाहरूखबरोबर "जब हॅरी मेट सेजल" सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.