ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16- गेल्या अनेक दिवसापासून दिग्दर्शक अनुराग कश्यप चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. अनुरागबद्दलची ही चर्चा त्याच्या आगामी सिनेमा विषयीची नाही, तर त्याच्या खाजगी जीवनाबद्दल आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्याची नवी गर्लफेंड हा सगळीकडे सध्या चर्चेचा विषय आहे. पहिली पत्नी आरती बजाज आणि दुसरी पत्नी कल्की कोचलीनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता अनुराग एका तेवीस वर्षीय तरूणीला डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे. शुभ्रा शेट्टी असं या तरूणीचं नाव आहे. शुभ्रासोबतचे काही फोटो अनुरागने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
अनुराग आणि शुभ्राचे हे फोटो पाहून दोघांमधील नात सगळ्यांसमोर स्पष्ट होत असल्याचं बोललं जातं आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप ४४ वर्षांचा आहे तर सध्या शुभ्रा शेट्टी 23 वर्षीय आहे. अनुराग कश्यपची ही गर्लफेंड त्याच्या मुलीच्या वयापेक्षा फक्त सहा वर्षांनी मोठी असल्याची चर्चा सध्या सिनेवर्तुळात सुरू झाली आहे. अनुरागची मुलगी आलिया आता 17 वर्षांची आहे. शुभ्रा सध्या अनुरागच्या ‘फॅंटम फिल्म्स’मध्येच काम करते. अनुराग आणि तिचे फोटो व्हायरल झाल्यापासूनच शुभ्राबाबत जास्त माहिती जाणून घेण्यासाठी अनेक जण तिच्या सोशल मीडिया अकाऊंटचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व चर्चा पाहता शुभ्राने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन काही पोस्ट डिलीट केल्या आहेत.
शुभ्रा मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजची विद्यार्थींनी आहे. तीने ‘मास कम्युनिकेशन’चं शिक्षण घेतलं आहे. अशी माहिती काही वेबसाइट्सने प्रसिद्ध केली आहे. आपल्याला दिलखुलास आयुष्य जगायला आवडतं, आधुनिक विचार ठेवून, चौकटीबाहेर जगलं पाहिजे, असं शुभ्राने तिच्या फेसबुक अंकाऊंटवर म्हंटलं आहे.
‘उडता पंजाब’, ‘रमन राघव २.०’ यांसारख्या सिनेमांसाठी तिने बॅकस्टेज बरंच काम केलं आहे. त्यामुळे अनुरागप्रमाणेच तीसुद्धा या क्षेत्रात बरीट सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘उडता पंजाब’ या सिनेमाच्या निर्मितीमध्ये शुभ्राचा मोलाचा वाटा असल्याचं बोललं जातं आहे. तसंच सिनेमा प्रदर्शनामध्ये आलेल्या अडचणीत ती अनुरागसोबत नेहमी असायची अशी माहितीसुद्धा समोर येते आहे.