Join us  

आणखी एक संजू... 'मुन्नाभाई'तला 'खलनायक' दाखवणार रामू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 9:22 AM

संजू' चित्रपटात संजय दत्तच्या जीवनातील काही वादग्रस्त पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला असला तरी अनेक वादग्रस्त बाबी दाखवणे टाळण्यात आले होते. त्यामुळे समाजात मुन्नाभाई म्हणून वावरत असलेल्या संजय दत्तमधील खलनायक जगासमोर आणण्यासाठी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा पुढे सरसावले आहेत.

मुंबई - "मुन्नाभाई" संजय दत्तच्या जीवनावर आधारित राजकुमार हिरानीने  दिग्दर्शित केलेला संजू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपहिट ठरला. संजू' चित्रपटात संजय दत्तच्या जीवनातील काही वादग्रस्त पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला असला तरी अनेक वादग्रस्त बाबी दाखवणे टाळण्यात आले होते. त्यामुळे समाजात मुन्नाभाई म्हणून वावरत असलेल्या संजय दत्तमधील खलनायक जगासमोर आणण्यासाठी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा पुढे सरसावले असून, ते संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार आहेत. रामगोपाल वर्मांचा हा चित्रपट मुख्यत्वेकरून 1993 चे बॉम्बस्फोट आणि एके 56 रायफल बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला झालेल्या अटकेवर बेतलेला असेल. 

संजू या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या चित्रपटात दाखवल्या जाणार असल्याचे प्रेक्षकांना वाटले होते. पण या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक गोष्टी दाखवण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि व्यक्तींविषयी संजू चित्रपटात काहीही दाखवण्यात का आले नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे. याचाचा आधार घेत रामूने संजय दत्तच्या जीवनातील वादग्रस्त पैलूंना हात घालण्याचे ठरवले आहे.   याबाबवर रामूला विचारले असता त्यानेही आपण संजूच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.  अंडरवर्ल्ड आणि वादग्रस्त विषयांवर चित्रपट बनवण्यात हातखंडा असलेला रामगोपाल वर्मा संजय दत्तवरील आपल्या चित्रपटात संजूच्या जीवनातील सर्वात वादग्रस्त भाग असलेल्या मुंबई बॉम्बस्फोट आणि त्याच्याकडे आढळलेल्या एके 56 चा विषक मांडणार आहे. 

टॅग्स :संजू चित्रपट 2018राम गोपाल वर्मासंजय दत्त