Join us  

अभिनेत्री प्रियांका चोप्राला मिळाला आणखी एक बिग बजेट चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 8:44 AM

 ‘क्वांटिको’ या सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन झाली आहे. आंतरराष्ट्रीय मनोरंजनविश्वातील प्रियांकाचा वावर आणि तिची लोकप्रियता पाहता तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे.

मुंबई : ‘क्वांटिको’ या सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन झाली आहे. आंतरराष्ट्रीय मनोरंजनविश्वातील प्रियांकाचा वावर आणि तिची लोकप्रियता पाहता तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. परदेशात जास्तीत जास्त वेळ व्यतित करणारी देसी गर्ल नुकतीच भारतात परतली असून तिच्या पदरामध्ये आणखी एक चित्रपट पडल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये वावरणाऱ्या प्रियांकाचं मानधन सध्या प्रचंड वाढलं असून ती लवकरच सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या चित्रपटासाठी प्रियांकाने तब्बल १४ कोटी रुपयांचे मानधन स्वीकारलं असून सर्वाधिक मानधन स्वीकारणाºया अभिनेत्रींच्या यादीमध्ये ती अव्वल स्थानावर असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र असं असूनही तिच्या वाट्याला आता आणखी एक चित्रपट आला आहे.

सूत्रांनुसार, ती लवकरच चित्रपट निर्मात्या सोनाली बोस यांच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. बोस यांच्या आगामी चित्रपटामध्ये प्रियांका अभिनेता फरहान अख्तर याच्याबरोबर प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट आयेशा चौधरी हिच्या जीवनावर आणि तिने लिहिलेल्या ‘माय लिटिल एपिफेनिस’ या पुस्तकावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूड