Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते'मधील अंकिताच्या महानाट्याचा होणार पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 11:11 IST

‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अभिषेकशी लग्न व्हावे म्हणून अंकिताने आत्महत्येचे खोटे नाटक केले होते.

अंकिताच्या या वागण्याचा अभिषेकसोबतच संपूर्ण कुटुंबाला संशय होताच आता अखेरीस अंकिताची पोलखोल करणार आहे. अंकिताने आत्महत्येचे हे खोटे नाट्य कसे रचले? यात कोण कोण सामील होते? हे सर्व आता उघड होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंकिताच्या या नाट्याविषयी अनिरुद्धला कल्पना आहे. अनिरुद्धला सर्व माहित असूनही त्याने या सर्व गोष्टींवर मौन धरले हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात पुन्हा एकदा उलथापालथ होणार आहे.

अरुंधती आणि अनिरुद्धचे नाते अतिशय नाजूक वळणावर असताना अनिरुद्धच्या अशा वागण्याने अरुंधती पुन्हा एकदा दुखावली गेली आहे. आतापर्यंत प्रत्येक संकटाचा देशमुख कुटुंबाने एकत्र येऊन धीराने सामना केला आहे. त्यामुळे अंकिताचे पितळ उघडे पडल्यावर देशमुख कुटुंब काय निर्णय घेणार याची उत्कंठा वाढली आहे. 

‘आई कुठे काय करते’च्या कथानकाकडे पाहिले तर प्रत्येकाच्या घरात घडणारे हे प्रसंग आहेत. कसोटीच्या या प्रसंगांना प्रत्येक घरातील गृहिणी ताकदीनीशी सामोरी जाते. प्रत्येक घरात अरुंधती पाहायला मिळते. आपलेसे वाटणारे कथानक आणि पात्र यामुळेच आई कुठे काय करते मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. मालिकेतील यापुढचा प्रवास तितकाच उत्कंठावर्धक असणार आहे. त्यामुळे अरुंधती मुलांच्या आयुष्यातील प्रश्न कसा सोडवणार हे पहाणे उत्सुकतेचे असेल.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका