Join us  

कियारा नाही तर कार्तिक आर्यनसोबत जमली भाभी 2 ची जोडी, 'भुलभुलैय्या'मध्ये घेतली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 2:33 PM

 'भूल भूलैया 3' मध्ये तृप्ती डिमरी कियारा अडवाणीची जागा घेणार आहे. त्याविषयीचं पोस्टर नुकतंच समोर आलंय

सध्या सर्वांना 'भूल भूलैया 3' (Bhool Bhulaiya 3) सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमाची काहीच दिवसांपुर्वी घोषणा झाली. लॉकडाऊनच्या काळात आलेला कार्तिक आर्यनचा 'भूल भूलैया 2' सिनेमा चांगलाच गाजला. सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली. शिवाय कार्तिक - कियाराच्या (Kartik Aryan) जोडीला प्रेक्षकांनी पसंती दिली. अशातच 'भूल भूलैया 3' मध्ये कार्तिक - कियारा (Kiara Advani) पुन्हा झळकणार का, याची सर्वांना उत्सुकता होती. पण 'भूल भूलैया 3'  बद्दल मोठी अपडेट समोर येतेय. ती म्हणजे या सिनेमात कार्तिकसोबत कियारा नाही तर 'अॅनिमल' (Animal) फेम भाभी २ झळकणार आहे. 

'भूल भूलैया 3' च्या टीमने काहीच वेळापुर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय.  या पोस्टमध्ये एक फोटो देण्यात आलाय. त्यावर लिहिण्यात आलंय की, "हृदयात धडकी भरवणारे हास्य." असं कॅप्शन देण्यात आलंय. हा फोटो बघताच लोकांनी अभिनेत्रीला लगेच ओळखलं असून ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे तृप्ती डिमरी. तृप्तीला 'भूल भूलैया 3' मध्ये कास्ट करण्यासाठी टीम उत्सुक आहे.

'अॅनिमल' सिनेमातून सर्वांच्या पसंतीस उतरलेली सर्वांची लाडकी भाभी 2 आता 'भूल भूलैया 3' मध्ये विशेष भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे 'भूल भूलैया 3' मध्ये कियाराच्या जागी तृप्ती डिमरी झळकणाार, यावर आता शिक्कामोर्तब झालाय. 'भूल भूलैया 3' च्या कास्टबद्दल बोलायचं झालं तर.. सिनेमात कार्तिक आर्यनसोबतचविद्या बालन, माधुरी दीक्षित या अभिनेत्रीही झळकणार आहेत.

टॅग्स :तृप्ती डिमरीभूल भुलैय्याकार्तिक आर्यनविद्या बालनमाधुरी दिक्षितकियारा अडवाणी