Join us  

एखाद्या सामान्य माणसाच्या पगाराइतकी आहे अनिल कपूरच्या या मास्कची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 4:16 PM

अनिल कपूर मलंग या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत मास्क घालून आला होता.

ठळक मुद्देया मास्कची किंमत 9300 रुपये असून हा मास्क अनिलसाठी खास बनवण्यात आला होता. डिझायनर विरगिल अब्लोहने हा मास्क बनवला होता. 

मलंग या चित्रपटाची सक्सेस पार्टी नुकतीच मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला चित्रपटाची सगळीच स्टार कास्ट उपस्थित होती. अनिल कपूर, दिशा पटानी, आदित्य रॉय कपूर, अमृता खानविलकर, कुणाल खेमु या सगळ्यांनीच या पार्टीला स्टायलिश अंदाजात हजेरी लावली. दिशा आणि आदित्य दोघेही या पार्टीला लाल रंगाच्या कपड्यांमध्ये दिसले. पण या सगळ्यात मीडियाचे सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते अनिल कपूरने... अनिल कपूर या पार्टीत चक्क मास्क घालून आला होता.

सध्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असल्याने अनिलने कोणताही धोका न पत्करता पार्टीला मास्क घालून येणे पसंत केले होते. त्याने लाल रंगाचा मास्क घातला होता आणि त्यावर मास्क आणि एका व्यक्तीचे नाव लिहिण्यात आले होते. या मास्कची किंमत काय होती हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल... या मास्कची किंमत 9300 रुपये असून हा मास्क अनिलसाठी खास बनवण्यात आला होता. डिझायनर विरगिल अब्लोहने हा मास्क बनवला होता. 

सध्या सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेटी मास्क घालून फिरताना दिसत आहेत. सामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रेटींनी देखील कोरोनाचा चांगलाच धसका घेतला आहे. 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. आता तर भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमाची शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. 

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :अनिल कपूरकोरोना वायरस बातम्यामलंगदिशा पाटनीअमृता खानविलकरआदित्य रॉय कपूरकुणाल खेमू