Join us

...आणि सुशांतने केली रजत कपूरची 'टिवटिव' बंद

By admin | Updated: October 13, 2016 15:22 IST

अभिनेता रजत कपूरने सुशांतसिंह राजपूतला दिसण्यावरुन डिवचले. क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी आणि सुशांतसिंह राजपूत या दोघांची तुलना केली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 13 - अभिनेता रजत कपूरने सुशांतसिंह राजपूतला दिसण्यावरुन डिवचणारे ट्विट केले होते. क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूत या दोघांची तुलना करत रजतने, 'मोठ्या पडद्यावर त्याची भूमिका साकारणा-या अभिनेत्यापेक्षा क्रिकेटर धोनी जास्त चांगला दिसतो', असे ट्विट केले. पुढे त्याने हॅशटॅग वापरत फॅक्ट (#fact) असेही ट्विटमध्ये नमूद केले. यावर, 'समजुतदार चित्रपट निर्मात्याकडून अशा प्रकारचे ट्विट येणे अपेक्षित नव्हते, एखाद्या अभिनेत्याला त्याच्या दिसण्यापेक्षा, तो करत असलेल्या कामावरुन पारखले पाहिजे', असे ट्विट रजतच्याच फॉलोअरने करत त्याच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला. यावर, 'मी फक्त धोनीची स्तुती करत होतो', अशी प्रतिक्रिया रजतने दिली.  
 
रजतने अशा पद्धतीने डिवचल्यानंतर सुशांतने संतापण्याऐवजी अतिशय शांतपणे रजतला उत्तर दिले. 'एम.एस. धोनी साकारण्यासाठी मी दिसण्यातील कमतरता भरुन काढण्यासाठी माझ्यातील कौशल्यावर जास्त काम केले,त्यामुळे इच्छा असेल तर सिनेमा नक्की पाहा', असे उत्तर देत सुशांतने रजतची 'टिवटिव' बंद केली आहे. दरम्यान, सुशांतने आतापर्यंत केलेल्या सिनेमांपैकी 'एम.एस. धोनी द अन्टोल्ड स्टोरी' या सिनेमाला जास्त यश मिळाले आहे. सिनेमाने दोन आठवड्यांमध्ये 112 कोटी रुपयांची कमाई केली आहे.