Join us

...अन् बोट कापले

By admin | Updated: January 17, 2015 00:29 IST

पतंगबाजीचा मोह हा सगळ्यांनाच होतो. त्यात महानायक अमिताभ बच्चनही आघाडीवर आहेत.

पतंगबाजीचा मोह हा सगळ्यांनाच होतो. त्यात महानायक अमिताभ बच्चनही आघाडीवर आहेत. एका चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी संक्रांतीच्या मुहूर्तावर गुजरातला गेलेल्या अमिताभ बच्चन यांना पतंग उडवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी मनसोक्त पतंग उडवला; मात्र पतंग उडवण्याच्या उत्साहात मांज्याने त्यांचे बोट कापले गेले. पण लगेच त्याला बँडेज लावून त्यांनी पुन्हा पतंगबाजीचा आनंद लुटलाच.