Join us  

'नवा गडी नवं राज्य'च्या आनंदीनं फ्लॉन्ट केली कर्वी फिगर, पल्लवी पाटीलचा 'तो' व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 4:28 PM

Pallavi Patil : अभिनेत्री पल्लवी पाटीलने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

अभिनेत्री पल्लवी पाटील (Pallavi Patil) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध भूमिका साकारली आहे. शेवटची ती झी मराठी वाहिनीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत पाहायला मिळाली होती. नुकतेच या मालिकेनं निरोप घेतला आहे. या मालिकेत पल्लवीने आनंदीची भूमिका साकारली होती. तिला या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. मालिकेनं निरोप घेतल्यानंतर ती सध्या कुठेय, काय करतेय हे जाणून घ्यायला सगळे उत्सुक आहेत. दरम्यान आता पल्लवीने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

अभिनेत्री पल्लवी पाटील सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिने ब्लॅक ब्रालेट आणि ब्लॅक पॅण्ट घातली आहे. यात ती तिची फिगर फ्लॉन्ट करताना दिसते आहे. यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला पसंती मिळताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

अभिनेत्री पल्लवी पाटीलने मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून तिच्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांना प्रभावित केले आहे. तिने तिच्या करिअरची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली आहे. ‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून तिने रसिकांचे मनोरंजन केले आहे.

टॅग्स :पल्लवी पाटील