नटरंगमधील ‘मला जाऊ द्या ना घरी...’ या लावणीने तमाम प्रेक्षकांना वेड लावले आणि त्यानंतर आता ‘नच बलिये - सीझन ७’मध्ये स्वत:चे उत्कृष्ट परफॉर्मन्स देऊन, दुसऱ्यांदा कार्यक्रमाच्या जेतेपदावर मराठी नाव कोरले, तिचे नाव अमृता खानविलकर. अमृता आणि तिच्या सारख्या अनेक अभिनेत्रींचा फिटनेस फंडा नेमका असतो तरी काय, याबद्दल नेहमीच सर्वांमध्ये उत्सुकता असते. पण या कलाकारांसारखे डाएट आणि व्यायाम केला, तर अशी फिगर कोणाचीही होऊ शकते. अमृता तिच्या फिटनेसबद्दल सांगते, प्रत्येकालाच व्यायामाची नितांत आवश्यकता आहे, त्यामुळे रोज न चुकता व्यायाम केलाच पाहिजे. मग त्यासाठी जिमला जा, घरच्या घरी व्यायाम करा किंवा सकाळी फिरायला जाऊन घाम येईपर्यंत व्यायाम करा. कारण, घामावाटे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडायला मदत होते आणि चेहऱ्यावरही तजेला येतो. त्याबरोबरच डाएटसाठी भरपूर पाणी प्यावे आणि संध्याकाळी शक्यतो लवकर जेवावे. हे सगळं करून आठवड्यातील एखादा दिवस असा ठेवा, की त्या दिवशी तुम्ही तुम्हाला पाहिजे ते खाऊ शकाल; पण इतर दिवशी मनावर ताबा ठेवलाय तर ‘फिट अँड फाइन’ राहणे अजिबातच अवघड नाही.
अमृताचा फिटनेस फंडा
By admin | Updated: August 30, 2015 03:13 IST