Join us

आलिया भट्टला आवडतो ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याचा स्टाईल सेन्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 18:17 IST

स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेता कोण वाटतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिच्या तोंडून निघालेल्या अभिनेत्याचं नाव ऐकताच उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

आलिया भट्ट ही बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री. आपल्या दमदार अभिनयासोबतच अनोख्या फॅशन सेन्समुळे तरुण अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच चर्चेत असते. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्याला आलियाने हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत तिला सर्वांत स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेता कोण वाटतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिच्या तोंडून निघालेल्या अभिनेत्याचं नाव ऐकताच उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

आलिया म्हणाली, ‘अमिताभ बच्चन हे मला नेहमीच स्टायलिश वाटतात आणि मला विजय देवरकोंडाचा स्टाइल सेन्स आवडतो, तो खूप भारी आहे.’ आलिया बॉलिवूडमधल्या एखाद्या अभिनेत्याचं नाव घेईल असं अनेकांना अपेक्षित होतं. पण आलियाने दाक्षिणात्य कलाकार विजय देवरकोंडाचं नाव घेतल्याने सर्वच जण थक्क झाले.

‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता विजय हा सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. आलिया व विजय यांची नुकतीच भेट झाली होती. चित्रपटांविषयी गप्पा मारण्यासाठी आलिया व विजय यांच्यासोबतच इतर सहाजण एका मुलाखतीत एकत्र उपस्थित होते. यामध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आयुषमान खुराना, पार्वती, विजय सेतुपती आणि मनोज बाजपेयी यांचा समावेश होता.

टॅग्स :आलिया भटविजय देवरकोंडा