अभिषेक कपूरच्या ‘फितूर’ नंतर दिपीका पादुकोनसोबत ‘पीकु’त एक झलक देत अभिनेता अक्षय ओबेरॉयने ‘पिझ्झा थ्रीडी’ सिनेमातून हॉलीवुडमध्ये पदापण केले. आता अक्षय त्याच्या आगामी ‘गुडगाव’या सिनेमात एकदम हटके लुकमध्ये दिसणार आहे. सिनेमातील रोलला टिपीकल लोकल टच आणि हरयाणवी बाज देण्यासाठी तो सध्या हरयाणवी भाषेचे धडे गिरवत आहे. अस्खलित हरयाणवीसाठी अक्षय स्थानिकांच्या मदतीने आणि हरयाणवी चित्रपट पाहत हरयाणवी शिकत आहे.
अक्षय ओबेरॉय शिकतोय हरयाणवी
By admin | Updated: February 13, 2015 23:23 IST