Join us  

Akshay Kumar : 'Capsule Gill'च्या सेटवरुन अक्षयचा लूक व्हायरल; 'या' व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट

By ओमकार संकपाळ | Published: July 08, 2022 10:11 PM

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक बायोपिक चित्रपट केले आहेत. नुकताच त्याचा पृथ्वीराज चित्रपट रिलीज झाला, त्यानंतर आता अक्षय अजून एका बायोपिकमध्ये काम करत आहे.

Akshay Kumar New Look :बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र याआधीच खिलाडी कुमारने एका नव्या प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. अक्षयने त्याच्या आगामी 'कॅप्सूल गिल' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. दरम्यान, 'कॅप्सूल गिल'च्या सेटवरील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक लीक झाला आहे. या फोटोची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. 

जसवंत गिलच्या भूमिकेत अक्षयव्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये अक्षय कुमार शीख सरदारच्या वेशात पगडी आणि चष्मा घातलेला दिसत आहे. या लूकमध्ये त्याला ओळखणेही कठीण होत आहे. त्याच्या या नव्या लूकचे फोटो चाहते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. विशेष म्हणजे, खाण अभियंता जसवंत गिल यांच्या जीवनावर हा 'कॅप्सूल गिल' चित्रपट आधारित आहे. 

अक्षय परिणीतीची जोडीया चित्रपटात अक्षय कुमार जसवंत गिलची भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये अक्षयसोबत परिणीती चोप्रा देखील असेल. 'केसरी'नंतर प्रेक्षकांना अक्षय आणि परिणीतीची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पूजा एन्टरटेन्मेंट आणि अजय कपूरच्या कायता प्रॉडक्शन करत आहेत.

कोण आहेत जसवंत गिल ?अभियंते जसवंत गिल 1989 मध्ये कोल इंडिया लिमिटेडमध्ये अभियंते होते. पश्चिम बंगालमधील राणीगंजच्या कोळसा खाणीत पाण्याचा पूर आला होता, ज्यात 60 हून अधिक मुले अडकली होती. मात्र जसवंत यांनी आपल्या टीमसह शौर्य दाखवत सर्व मुलांचे प्राण वाचवले होते.

टॅग्स :अक्षय कुमारआत्मचरित्रबॉलिवूड