Join us  

केसरी या चित्रपटाच्या टीमला प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी बसला हा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 5:01 PM

केसरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी ऑनलाईन लीक झाला आहे. 

ठळक मुद्देकेसरी हा चित्रपट तामिळरॉकर्स सारख्या काही वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे. केसरी या चित्रपटाआधी देखील अनेक चित्रपटांना पायरसीमुळे नुकसान सहन करावे लागले आहे.

केसरी या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून या चित्रपटातील त्याची भूमिका ही आजवरच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. सारागढी येथे झालेल्या लढाईवर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता होती. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी ऑनलाईन लीक झाला आहे. 

केसरी हा चित्रपट तामिळरॉकर्स सारख्या काही वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे. केसरी या चित्रपटाआधी देखील अनेक चित्रपटांना पायरसीमुळे नुकसान सहन करावे लागले आहे. सिम्बा, टोटल धमाल, मनकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी यांसारख्या अनेक चित्रपटांना आजवर पायरसीचा फटका बसला आहे. पायरसी रोखण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील मंडळी करत आहेत. पण त्याचा काहीही फायदा होत नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला होता आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. पहिल्या दिवशी ‘केसरी’ने २१. ५० कोटींची कमाई केली. ही कमाई यासाठीही उल्लेखनीय आहे कारण, होळीच्या दिवशी सकाळी ‘केसरी’चे फार कमी शो होते. बहुतांश शो संध्याकाळचे होते. पण तरीही ‘केसरी’ने बाजी मारली आणि हा चित्रपट अक्षय कुमारच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला. गुरुवारी रिलीज झालेल्या ‘केसरी’ला चार दिवसांचा वीकेंड मिळणार आहे. समीक्षकांची दाद आणि प्रेक्षकांची माऊथ पब्लिसिटी या जोरावर ‘केसरी’कडून बक्कळ कमाईची अपेक्षा केली जात आहे. कदाचित पहिल्याच वीकेंडमध्ये हा चित्रपट १०० कोटींची कमाई करेल, असे मानले जात आहे. ‘केसरी’ची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनने केली आहे तर अनुराग सिंहने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व परिणीती चोप्रा लीड रोलमध्ये आहेत. पायरसीमुळे आता चित्रपटाच्या कलेक्शनवर काही फरक पडतोय का हे काही दिवसांतच कळेल.

टॅग्स :केसरीअक्षय कुमार