Join us

अक्कासाहेब मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 02:25 IST

पुढचे पाऊल या मालिकेतील कुटुंब हे कोल्हापूरमध्ये स्थायिक असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पण, या मालिकेतील अक्कासाहेब आता मुंबईत येणार आहेत. अक्कासाहेब कोल्हापूरमधील

पुढचे पाऊल या मालिकेतील कुटुंब हे कोल्हापूरमध्ये स्थायिक असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पण, या मालिकेतील अक्कासाहेब आता मुंबईत येणार आहेत. अक्कासाहेब कोल्हापूरमधील किडनीचे मोठे रॅकेट उघडकीस आणणार आहेत. पण हे सगळे सुरू असताना त्यांची सून कल्याणी हॉस्पिटलमधून गायब होणार आहे. कल्याणी काही केल्या त्यांना सापडत नसल्याने तिच्या शोधासाठी अक्कासाहेब आता थेट मुंबई गाठणार आहेत. कल्याणीसारखी एक मुलगी मुंबईला एका व्यक्तिसोबत जाताना दिसली अशी बातमी कळल्याने तिच्या शोधासाठी अक्कासाहेब आता मुंबईला जाणार आहेत.