Join us  

आर्चीचा ट्रॅक्टर चोरला का रे! कामातून ब्रेक घेत आकाशची गावाकडे धमाल; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 11:44 AM

आकाशने शेअर केलेले व्हिडिओ बघून तुम्हालाही येईल गावाकडची आठवण

मराठी सिनेसृष्टीत माईलस्टोन ठरलेला सिनेमा म्हणजे 'सैराट'. या चित्रपटामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आर्ची आणि परश्याची ओळख झाली. रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) दोघंही अत्यंत साध्या कुटुंबातून आले आणि लोकप्रिय कलाकार झाले. सैराटला मिळालेल्या यशानंतरही आकाश ठोसर अजूनही गावाकडचं आयुष्य एंजॉय करतो. शेती, ट्रॅक्टर चालवणं, मटण बनवणं अन् नदीत पोहायला जाणं अशी  धम्माल सध्या त्याची सुरु आहे. शेतात ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

आकाश ठोसर मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला असून शहरापेक्षा गावातील घरात राहणंच तो जास्त पसंत करतो. सैराटच्या यशाने हुरळून न जाता त्याची आजही गावाशी नाळ जोडलेली आहे. शूटिंग असलं नसलं तरी तो ब्रेक घेत गावाकडे जातोच. इतकंच नाही तर तो शेती करतो, स्वयंपाकही करतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत जे व्हायरल होत आहेत.

आकाशच्या या पोस्टवर एका चाहत्याने भन्नाट कमेंट केली आहे. 'आर्चीचा ट्रॅक्टर चोरला का रे' असं म्हणत त्याने आकाशची फिरकी घेतली आहे. सैराट सिनेमात आर्चीला बुलेट, ट्रॅक्टर चालवताना दाखवले होते. तिचे हे सीन खूपच गाजले होते. आकाशचा नुकताच 'घर बंदुक बिरयानी' हा सिनेमा रिलीज झाला.  यामध्ये आकाशचा वेगळाच लुक बघायला मिळाला. त्याच्या अभिनयाचंही कौतुक झालं.  सध्या आकाशने कामातून ब्रेक घेतला असून तो गावाकडे वेळ घालवत आहे.

टॅग्स :आकाश ठोसरमराठी अभिनेतासोशल मीडियारिंकू राजगुरू