Join us  

'सन ऑफ सरदार 2'मध्ये अजय देवगणसोबत सोनाक्षी सिन्हा आणि सजंय दत्त झळकणार ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 1:43 PM

कुठल्याही लोकप्रिय सिनेमाचा सिक्वेल हा प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय असतो.

कुठल्याही लोकप्रिय सिनेमाचा सिक्वेल हा प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. सिक्वेल चित्रपटांना मिळणारं यश लक्षात घेऊन आगामी काळात सुमारे डझनाहून अधिक असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अजय देवगन हा फ्रँचायझी चित्रपटांच्या बाबतीत आघाडीवर आहे. अजय देवगणकडे सध्या अनेक चित्रपट आहेत, ज्यात सिंघम अगेन, रेड 2, दृश्यम 3, दे दे प्यार दे 2, गोलमाल 5 यांचा समावेश आहे आणि आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. लवकरच हा 'सन ऑफ सरदार 2' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, यात एक ट्विस्ट आहे. 

सिक्वेल चित्रपटांमध्ये अनेकदा असे दिसून येते की मूळ चित्रपटातील कलाकारांना घेऊन फ्रँचायझी पुढे नेण्याला निर्मात्यांचे प्राधान्य असते. पण, असं  'सन ऑफ सरदार 2' सिनेमाच्या बाबतीत घडणार नाही. या सिनेमाच्या शुटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. पूर्णपणे नवीन टीमसोबत "सन ऑफ सरदार 2" बनवण्यात येणार आहे.यामध्ये दिग्दर्शकापासून कलाकारांपर्यंत संपूर्ण टीम नवीन असेल. 'सन ऑफ सरदार 2' मध्ये मूळ चित्रपटातून फक्त अजय दिसणार आहे. सोनाक्षी आणि संजय दोघेही सिक्वेलमध्ये दिसणार नाहीत.

अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, अजय देवगण जूनपासून लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पंजाबी चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय कुमार अरोरा करणार असल्याचं बोललं जात आहे. 'सन ऑफ सरदार 2' हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट असेल.  सध्या अजय सिंघम अगेन आणि रेड २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  

टॅग्स :अजय देवगणसोनाक्षी सिन्हासंजय दत्त