Join us  

अजय-अतुल म्हणताहेत, ‘जाऊंद्याना बाळासाहेब’

By admin | Published: August 08, 2016 2:54 AM

अजय-अतुल निर्माते म्हटल्यावर एखादी म्युझिकल लव्हस्टोरी घेतील, असे वाटते. प्रथमच निर्मात्याच्या भूमिकेत आलेल्या अजय-अतुल यांनी आपल्या चित्रपटासाठी सामाजिक विषय निवडला आहे

अजय-अतुल निर्माते म्हटल्यावर एखादी म्युझिकल लव्हस्टोरी घेतील, असे वाटते. प्रथमच निर्मात्याच्या भूमिकेत आलेल्या अजय-अतुल यांनी आपल्या चित्रपटासाठी सामाजिक विषय निवडला आहे. राजकीय परिस्थितीवर विनोदी भाष्य करणारा ‘जाऊद्यांना बाळासाहेब’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.अजय-अतुलच्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याबाबत कमालीची उत्सुकता होती. गिरीश कुलकर्णीचे दिग्दर्शन हेदेखील या चित्रपटाचे विशेष मानले जात आहे. नुकतेच या चित्रपटाचे ‘टीझर मोशन पोस्टर’ सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. ‘अनोख्या वेशात आणि भलत्याच जोशात, झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्यांना जागं करायला येतोय ‘जाऊद्यांना बाळासाहेब’ अशी टॅगलाईन असलेले हे पोस्टर आहे. गिरीश कुलकर्णी दिग्दर्शनाबराबेरच प्रमुख भूमिकेतदेखील दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेते मोहन जोशी, रिमा लागू, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, मनवा नाईक, पूर्वा पवार, नंदकिशोर चौगुले, श्रीकांत यादव, सविता प्रभुणे, भाऊ कदम, स्पृहा जोशी अशा तगड्या कलाकारांची फौज चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अजय-अतुल आपल्या स्वत:च्या चित्रपटात संगीताचे काय प्रयोग करीत आहेत, याचीदेखील उत्सुकता आहे.