ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - कान्स चित्रपट महोत्सवाला दरवर्षी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हजेरी लावते. कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याचा पोषाख नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असतो. यावर्षीही ६९ व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या गोल्डन ड्रेसमध्ये अवतरतली आणि तिने अनेकांना घायाळ केले.
यात तिचा नवरा अभिषेक बच्चनही आहे. विवाहानंतरही ऐश्वर्याचे सौदर्य अनेकांना घायाळ करते. अभिषेकने सोशल मिडीयावर ऐश्वर्याचा ब्लँक अँड व्हाईट फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्या फोटोखाली त्याने एक फोटो हजार शब्दांचे काम करतो असा संदेश लिहीला आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या २००७ मध्ये विवाहबद्ध झाले. अभिषेकने सोशल मिडीयावर ऐश्वर्याचा जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये ऐश्वर्याने परिधान केलेला ड्रेस कुवेतच्या अली युनूसने डिझाईन केला होता. कान्सला उपस्थित रहाण्याचे ऐश्वर्याचे हे पंधरावे वर्ष आहे.