Join us  

शाहरुखच्या लेकीची दमदार कामगिरी! शेतजमिनीनंतर आता सुहानाने अलिबागमध्ये खरेदी केला कोट्यवधींचा प्लॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 8:57 AM

बाप तशी लेक! सुहाना खानने २३व्या वर्षी अलिबागमध्ये खरेदी केला 'इतक्या' कोटींचा प्लॉट

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शाहरुखची लेक सुहानानेदेखील अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं आहे.  झोया अख्तरच्या 'द आर्चिज' या सिनेमातून सुहानाने २०२३मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुहानाचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस फारसा उतरला नाही. पण, या सिनेमानंतर सुहानाने दमदार कामगिरी केली आहे. अवघ्या २३व्या वर्षी तिने अलिबागमध्ये प्लॉट खरेदी केल्याची माहिती आहे. 

मुंबईपासून अगदी काहीच किमी अंतरावर असलेल्या अलिबाग येथील एका गावात सुहानाने प्लॉट खरेदी केला आहे. तब्बल ७८ हजार ३६१ स्केअर फूटचा हा प्लॉट आहे. याची किंमत ९.५ कोटींच्या घरात असून सध्या सुहानाने स्टॅम्प ड्युटी ५७ लाख रुपये भरले आहेत. जून २०२३मध्ये सुहानाने १.५ एकर शेतजमीन खरेदी केली होती. सुहानाने रायगडमधील अलिबागमध्येच सुमारे १२.९१ कोटींना ही शेतजमीन खरेदी केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच आता तिने प्लॉट खरेदी केला आहे. 

सुहानाआधी शाहरुखनेही अलिबागमध्ये व्हिला घेतला होता. त्याचा हा व्हिला समुद्राजवळ असून त्यात हेलिपॅड, स्विमिंग पूलसारख्या सोयी आहेत.त्याचा हा व्हिला २० हजार स्केअर फूट इतक्या जागेत पसरला आहे.  याआधीही अनेक सेलिब्रिटींनी अलिबागमध्ये प्रॉपर्टी विकत घेतली आहे. दिवसेंदिवस अलिबाग सेलिब्रिटींना आकर्षित करत आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा, रणवीर सिंग-दीपिका पदुकोण यांनीही अलिबागमध्ये प्रॉपर्टी विकत घेतली आहे. 

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान