Join us  

लग्नानंतर वर्षभरातच घटस्फोट, आता दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार प्रतिक बब्बर; जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:41 PM

सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा राज बब्बर दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. 

Pratik Babbar : सिनेसृष्टीतील दिग्गज आभिनेत्री स्मिता पाटील यांनी राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतिक बब्बर दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा चांगलीच रंगतेय. अभिनेता प्रतिक बब्बर नेहमीच बिनधास्त आणि मस्तमौला अंदाजासाठी ओळखला जातो. पण सध्या हा अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय. भरला संसार मोडल्यानंतर प्रतिक बब्बर दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरत आहे.

गतवर्षी व्हेलेन्टाईनच्या दिवशी या अभिनेत्याने आपल्या प्रेमाचा खुलासा करत तो अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत असल्याचा वृत्ताला त्याने दुजोरा दिला.या दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. नंतर त्यांची मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आहे. प्रिया बॅनर्जी अभिनेत्रीबरोबरच मॉडल देखील आहे. व्हेलेन्टाईनच्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यामातून आपले फोटो शेअर करत या दोघांनी आपलं नातं अधिकृत केलं. 

अभिनेता प्रतिक बब्बरने २३ जानेवारी २०१९ मध्ये सान्या सागरशी लग्न केलं होतं. लग्नाआधी हे दोघं एकमेकांना डेट करत होते, कालांताराने वैयक्तिक मतभेदांमुळे त्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. लग्नाच्या वर्षभरानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. 

कोण आहे प्रिया बॅनर्जी ?

प्रिया बॅनर्जी अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत  'जजबा' चित्रपटात झळकली होती. उत्तम अभिनयाबरोबर मॉडलिंगमध्ये चमक दाखवणाऱ्या प्रिया बॅनर्जीसोबत प्रतिक बब्बर लवकरच लग्नगाठ बांधेल अशी माहिती मिळत आहे. 

येथे पाहा - 

टॅग्स :प्रतीक बब्बरस्मिता पाटीलराज बब्बर