Join us  

केवळ आडनाव सारखी म्हणून जुही चावलाची बहिण समजायचे या अभिनेत्रीला,नाव जाणून वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 3:01 PM

सलमान खानसोबत 'तेरे नाम' सिनेमात काम केले. तेरे नाम सिनेमातूनच ती प्रकाशझोतात आली होती.

गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी चुलबुली गर्ल म्हणजेच अभिनेत्री जुही चावला. अभिनयच नाही तर तिच्या सौंदर्यावरही चाहते फिदा व्हायचे. आजही जुहीची जादू कमी झालेली नाही. चाहते आजही तिच्यावर लट्टू होतात. जुही चावलाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. पण सगळ्यांनाच जुहीप्रमाणे यश मिळवता आले नाही. त्यामुळे बॉलिवूडमध्ये कधी आले आणि कधी गेले कोणालाच कळाले नाही.

बॉलिवूडमध्ये करिअर फ्लॉप ठरलेल्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री भूमिका चावलाही गणली जाते. मुळात भूमिका चावलाचे आडनाव जुहीचे आडनाव सारखेच असल्यामुळे चाहतेही दोघींना बहिणीच समजायचे.  आडनाव सारखी असल्यामुळे चाहत्यांचा हा मोठा घोळ व्हायचा.  जुहीप्रमाणे हवे तसे तिला यश मिळाले नसले तरी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत भूमिका चावला प्रसिद्ध आहे. 

दक्षिण इंडस्ट्रीमध्ये 9 सिनेमे केल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. भूमिकाला जाहिरात आणि हिंदी म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2003 मध्ये तिने सलमान खानसोबत 'तेरे नाम' सिनेमात काम केले. तेरे नाम सिनेमातूनच ती प्रकाशझोतात आली होती. मात्र तिचे हे यश फार काळ काही टिकले नाही.

 

या सिनेमानंतर  तिने 'रन', 'दिल ने जिसे अपना कहा', 'सिलसिले', 'दिल जो भी कहे', 'फॅमिली', 'गांधी माय फादर' सारख्या बॉलिवू़ड सिनेमांत काम केले. परंतु हे सर्व सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकले नाही. सगळेच सिनेमा एकामागून एक फ्लॉप ठरले. सिनेमांच्या अपयशासोबत भूमिकाचे बॉलिवूडमधील करिअरसुध्दा संपुष्टात आले. मात्र दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तिचा दबदबा आजही कायम आहे.

भूमिकाने 2007 साली योगा शिक्षक भरत ठाकूरसोबत लग्न करत संसारात रमली. लग्नाच्या अगोदर दोघांचे जवळपास 4 वर्ष अफेअर होते. भूमिका, भरत यांच्याकडूनच योगाचे शिक्षण घेत होती. या दरम्यान या दोघांची चांगली मैत्री झाली होती इथूनच त्यांच्या प्रेमाचीही सुरुवात झाली होती. दोघांनी नाशिकमध्ये गुरूद्वारात लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.  

टॅग्स :जुही चावला भूमिका चावला