Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास सुनबाई! मृणाल कुलकर्णींंनी शिवानी रांगोळेचे कौतुक, म्हणाल्या, "तिची खरी ताकद..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 19:01 IST

: शिवानी व तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्यात खास बॉन्ड आहे. शिवानी ही सासूबाईची अत्यंत लाडकी आहे.

मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णीने गेल्या वर्षी अभिनेत्री शिवानी रांगोळेशी लग्नगाठ बांधली. अशा प्रकारे मृणाल कुलकर्णी खऱ्या आयुष्यात सासूच्या भूमिकेत गेल्या. सून शिवानीचं त्या नेहमीच कौतुक करताना दिसतात. लवकरच दोघी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार सिनेमाच्या निमित्ताने एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यावेशळी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मृणाल कुलकर्णी यांनी सुनेचे खूपच कौतुक केलं आहे. 

शिवानीचं का बघून का म्हणाला तुम्ही? असा प्रश्न विचारल्यावर, मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ''शब्बास सुनबाई, सून म्हणून पण हेच म्हणेन मी आणि ती तर उत्कृष्ट अभिनेत्री आहेच, हे तिने अनेक भूमिकांमधून सिद्ध केलेलं आहेत. मी तिला पहिल्यांदा पाहिलं & जरा हटके या चित्रपटात तिची प्रमुख भूमिका होती. आम्ही दोघींनी एकत्र काम केलं होत त्यात. त्यावेळी ती लहान तिची ताकद तेव्हाच कळली होती. त्यानंतर तिने अनेक भूमिका मालिकांमध्ये असतील किंवा चित्रपटातील तिने उत्तम पार पडल्या. सध्या सुरु असलेल्या तुला शिकविन चांगलाच धडा मालिकेत ती सगळ्यांचं चांगले धडे शिकवते आहे. तिची ताकद कळलीच. अशा एका मोठा सिरीजचा भाग तिला होता आला याचाही आनंद आहे,'' असं त्या म्हणाल्या.  

 सुभेदार सिनेमात मृणाल कुलकर्णी यांनी जिजाऊंची भूमिका साकारली आहे. तर शिवानी यात यशोदाबाईंची भूमिकेत दिसणार आहे. दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत. 

टॅग्स :मृणाल कुलकर्णीशिवानी रांगोळे