Join us  

मराठी सिनेसृष्टीत कास्टिंग काऊच आणि गटबाजी ? अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद स्पष्टच म्हणाली...

By मयुरी वाशिंबे | Published: April 17, 2024 8:00 AM

बॉलिवूड असो वा मराठी, इंडस्ट्रीतील गटबाजी हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे.

मनोरंजन इंडस्ट्रीतील गटबाजी हा असा एक विषय आहे, ज्यावर कलाकार सहसा मोकळेपणे व्यक्त होत नाहीत. बॉलिवूड असो वा मराठी, इंडस्ट्रीतील गटबाजी हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. मराठी सिनेसृष्टीत कास्टिंग काऊच, गटबाजी असल्याचा मुद्दा अनेकदा चर्चेत येतो. यावर अनेक मराठी अभिनेत्रींनी स्पष्टपणे मत मांडलं आहे. यातच आता अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद ही मराठी इंडस्ट्रीतील (Marathi industry) तिच्या अनुभवाविषयी व्यक्त झाली. 

भाग्यश्री मिलिंदनं 'लोकमत फिल्मी'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी तिनं तिच्या व्यवसायीक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. सिनेसृष्ट्री म्हटलं की कास्टिंग काऊच किंवा गटबाजी हे विषय नाही म्हटलं तर येतातच, तर असा काही अनुभव इंडस्ट्रीत आला का, या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली, ' गटबाजी आणि कास्टिंग काऊच याचा मला कधीच अनुभव आला नाही. खरं तर मी कोणत्याही गटात नाही. आतापर्यंत मी जी कामे केली आहेत. ती ऑडिशन देऊनच केली आहेत'.

पुढे ती म्हणाली, 'माझी इंडस्ट्रीमध्ये कुणाशीही ओळख नव्हती. माझ्या कुटुंबातूनदेखील कुणाचा इंडस्ट्रीशी संबंध नाही.  मग ते आनंदी गोपाळचे दिग्दर्शक समीर संजय विद्वांस असो, रवी जाधव किंवा तेजस्वीनी पंडित असो. मी मराठी कलाकारांबरोबर काम केली आहेत. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे'.

'बालक-पालक', 'आनंदी गोपाळ', 'उबूंटू' अशा अनेक चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे भाग्यश्री खूपच लोकप्रिय आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. मराठी पाठोपाठच भाग्यश्री मिलिंद आता गुजराती थिएटरमध्ये काम करत आहे. मराठी नाटक 'अनन्या' चे रूपांतर असलेल्या 'एक छोकरी साव अनोखी' या गुजराती नाटकातून आपल्या अभिनयाची छाप सोडतं आहे. हे नाटक प्रेक्षकांना खूप पसंत पडलंय.

टॅग्स :भाग्यश्री मिलिंदसेलिब्रिटीमराठी अभिनेतामराठी चित्रपटकास्टिंग काऊच