Join us  

अभिनेत्री अदिती द्रविडचे स्वप्न झाले साकार!! मुंबईत घेतलं घर, गृहप्रवेशाचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 6:44 PM

Aditi Dravid : अक्षय्य तृतियेच्या मुहुर्तावर अदिती द्रविडने स्वत:चे घर खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत याबाबत तिने माहिती दिली आहे.

मराठी टेलिव्हिजन जगतातील अदिती द्रविड प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतेच तिने एक खुशखबर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने अक्षय तृतियेच्या शुभ मुहू्र्तावर घर विकत घेतले आहे. दरम्यान आता तिने गृह प्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

अक्षय्य तृतियेच्या मुहुर्तावर अदिती द्रविडने स्वत:चे घर खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत याबाबत अदितीने माहिती दिली आहे. अदितीने मुंबईत तिच्या स्वप्नातील घर खरेदी केले आहे. तिने फोटो शेअर करत म्हटले की, "फायनली, मी मुंबईला हो म्हणाले".  त्यानंतर आता तिने गृहप्रवेशाचा फोटो शेअर केले आहेत.  तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, गृहप्रवेश आणि पहिली गोवर्‍यांची चूल! तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक कलाकारांनीही अदितीने नवीन घर घेतल्याने तिचे अभिनंदन केले आहे. 

अदिती द्रविडच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने मालिकांबरोबरच नाटक आणि चित्रपटातही काम केले आहे. ती 'बाईपण भारी देवा' सिनेमामुळे चर्चेत आली होती. 'बाईपण भारी देवा'मधील 'मंगळागौर' हे गाणं लोकप्रिय ठरलं होतं. हे गाणं अदितीने लिहिले आहे. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 

टॅग्स :अदिती द्रविड