Join us  

'या' अभिनेत्याच्या वडिलांवर दहशतवाद्यांनी घरात घुसून झाडल्या होत्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 6:59 PM

घर सोडून निर्वासित छावणीतही त्यानं दिवस काढले आहेत. 

बॉलिवूड अभिनेता संजय सुरी प्रसिद्ध आहे. जबरदस्त अभिनय कौशल्य असूनही त्याला इंडस्ट्रीत खूप संघर्ष करावा लागला आहे. त्यानं केवळ अभिनयच केला नाही तर अनेक चमकदार चित्रपटांची निर्मिती केली. 2011 मध्ये 'आय एम' या चित्रपटासाठी संजयला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. संजयचा बॉलिवूडमध्ये प्रवास सोपा नव्हताच. पण, त्याचं वैयक्तीक आयुष्यही वेदनांनी भरलेलं आहे. संजय सुरीनं एका दहशतवादी हल्ल्यात वडिलांना गमावलं होतं. ऐवढचं नाही तर घर सोडून निर्वासित छावणीतही त्यानं दिवस काढले आहेत. 

 श्रीनगरमध्ये जन्मलेला संजय सुरी हा काश्मिरी पंडित आहे. त्याची १९ वर्षे श्रीनगरमध्ये गेली. पण एके दिवशी त्याचं आयुष्य कायमचं बदललं. 1 ऑगस्ट 1990 रोजी संजय सुरींन दहशतवादी हल्ल्यात वडिलांना कायमचं गमावलं. दहशतवाद्यांनी घरात घुसून अभिनेत्याच्या वडिलांना गोळ्या झाडल्या होत्या. वडिलांना गमावल्याचं दु:ख आजही कायम असल्याचं त्यानं सांगितलं. 

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत संजय सुरी म्हणाल, "तो काळ वेदनादायक होता. त्यावेळी मी फक्त 19 वर्षांचा होतो. श्रीनगरमध्ये आम्ही माझ्या वडिलांचे अंतिम संस्कारही करू शकलो नव्हतो. आम्हाला श्रीनगर सोडून जम्मूला पळून जावं लागलं. तिथे आम्ही काही दिवस छावणीत काढल्यानंतर दिल्लीला शिफ्ट झालो होतो". 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, संजय सूरीने मॉडेलिंग केलं आणि त्यानंतर 1999 मध्ये 'प्यार में कभी कभी' या चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणून काम केलं. या चित्रपटात रिंकी खन्ना आणि दिनो मोरिया मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी संजय सूरीचा अभिनय चाहत्यांना आवडला. तर 'झंकार बीट्स' या चित्रपटातून संजय सूरीला ओळख मिळाली, ज्यामध्ये तो जुही चावलासोबत दिसला होता. यानंतर त्याने उर्मिला मातोंडकरसह काम केलं. अभिनेता म्हणून संजय सुरी यांची कारकीर्द सुपरहिट नसली तरी निर्माता म्हणून त्यांनं खूप नाव कमावलं आहे. 

टॅग्स :संजय सुरीबॉलिवूडजम्मू-काश्मीर