Join us  

'वागले की दुनिया' मालिकेतील कलाकारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 7:58 PM

'वागले की दुनिया' मालिका ५०० एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण करत असताना कलाकार व टीमने महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से’ सामान्‍य मध्‍यमवर्गीय भारतीयाच्‍या दैनंदिन समस्‍यांना सुरेखरित्‍या सादर करते. या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिका ५०० एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण करत असताना कलाकार व टीमने महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्‍यांच्‍यासोबत सामान्‍य व्‍यक्‍तींचे नेते व प्रतिनिधी म्‍हणून मालिकेच्‍या यशाबाबत सांगितले. हा टप्‍पा साजरा करण्‍यासाठी आठवडाभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे, जसे पूजा, सेलिब्रेटरी लंच आणि सेटवर केक कापण्‍याचा समारोह. टीमने एकनाथ शिंदे यांची मुंबईतील मलबार हिल येथे त्‍यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा वंगल्‍यावर भेट घेत मोठ्या उत्‍साहात साजरीकरण केले.

‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से’ ही सोनी सबवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे आणि जीवनाच्‍या विविध स्‍तरांमधील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. ही मालिका मध्‍यमवर्गीय कुटुंबाच्‍या संघर्षाला आणि त्‍यांच्‍या उपायांना सादर करते, ज्‍यामधून प्रेक्षकांना प्रत्‍येकवेळी नवीन बोध मिळतो. स्‍टार कलाकार सुमीत राघवन, परिवा प्रणती, भारती आचरेकर, अंजन श्रीवास्‍तव, चिन्‍मयी साळवी, शीहान कपाही यांच्‍यासह मालिकेचे निर्माते जेडी मजेठिया आणि सोनी सबचे व्‍यवसाय प्रमुखनीरज व्‍यास यांनी मुख्‍यमंत्र्यांची भेट घेतली.

यावेळी एकनाथ शिंदे म्‍हणाले, “माझे वागळे शब्‍दाशी सखोल नाते आहे, कारण ठाण्‍यातील वागळे इंडस्‍ट्रीयल इस्‍टेटमध्‍ये सामाजिक कार्यकर्ता म्‍हणून माझ्या प्रवासाची सुरूवात झाली होती. मालिका ‘वागले की दुनिया’ सामान्‍य माणसाच्‍या दैनंदिन संघर्षांना दाखवते. महाराष्‍ट्र राज्‍याचा मुख्‍यमंत्री म्‍हणून मी सामान्‍य माणसाच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याप्रती वचनबद्ध आहे. मालिका ‘वागले की दुनिया’ने सामान्‍य माणसाच्‍या जीवनाला सादर करत आणि अनेक सामाजिक समस्‍यांशी संबंधित उपाय दाखवत अद्भुत कामगिरी केली आहे. मला आनंद होत आहे की, चॅनेल व निर्मात्‍यांनी असे उपक्रम हाती घेतले आहेत. दैनंदिन मालिका मनोरंजन करण्‍यासोबत उत्तम नैतिक संदेश देखील देत आहेत, ज्‍याचा प्रेक्षकांच्‍या मानसिकतेवर लक्षणीय परिणाम होत आहे, परिणामी उत्तम समाज निर्माण होण्‍यास मदत होईल, म्‍हणूनच मी देखील माझ्या जनतेप्रती वचनबद्ध आहे. मी यशस्‍वीरित्या ५०० एपिसोड्स पूर्ण करण्‍यासाठी या मालिकेच्‍या टीमचे अभिनंदन करतो आणि त्‍यांच्‍या भावी प्रयत्‍नांसाठी शुभेच्‍छा देतो.’’

टॅग्स :एकनाथ शिंदेसुमीत राघवन