Join us

अभिनेता शाहिद कपूरला कन्यारत्न

By admin | Updated: August 26, 2016 21:41 IST

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याला गोड बातमी मिळाली असून त्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. शाहिदची पत्नी मीराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 -  बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याला गोड बातमी मिळाली असून त्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. शाहिदची पत्नी मीराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
 
मुंबईमधील खार येथील हिंदूजा रुग्णालयात मीराला गुरुवारी संध्याकाळी दाखल करण्यात आलं होतं. आज संध्याकाळी तिने मुलीला जन्म दिला. बाळाचं वजन 2.8 किलो असून दोघेही सुखरुप असल्याचे समजते.
 
दोनच दिवसांपूर्वी शाहिदने मीरासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाह 7 जुलै, 2015 रोजी झाला होता.