Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता अनुम सोनी आणि राज बब्बर यांच्यात आहे खास नातं, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 17:11 IST

अनुम सोनी आणि राज बब्बर यांचं एक वेगळं आणि खास नातं आहे.

अनुप सोनीने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे बालिकावधू या मालिकेतील काम प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते.  क्राईम पेट्रोल मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. अनुप हा मुळचा पंजाबचा असून त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत. एनएसडीमधून बाहेर पडल्यानंतर त्याने सी हॉक्स, साया यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. या मालिकांमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

पण तुम्हाला माहिती आहे का अनुप सोनी आणि राज बब्बर  यांचं एक वेगळं आणि खास नातं आहे. अनेकवेळा अनुपच्या सोशल मीडिया अकाऊंटवर राज बब्बर यांच्या संपूर्ण कुटुंबासोबतचे फोटो दिसतात. अनुप सोनी हा अभिनेते राज बब्बर यांचा जावई आहे. अनुपने राज बब्बर यांचा मुलगी जुही बब्बरशी लग्न केलं आहे. अनुप आणि जुही दोघांचेही हे दुसरं लग्न आहे. 

अनुप आणि जुहीची ओळख एका थिएटर ग्रुपमध्ये झाली. दोघे नादिरा बब्बर यांच्या नाटकात दोघांनी काम केले आहे.  2011मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.अनुप आणि जुहीला इमान नावाचा  मुलगा आहे.

अनुप सोनीने सुपरहिट ठरलेली 'बालिका वधू' मालिकेतही भैरव धरमवीर सिंगही भूमिका साकारली होती.मालिकेतील इतर भूमिकांप्रमाणे ही भूमिकाही रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.टीव्ही मालिकांसह त्याने अनेक हिंदी सिनेमातही विविधांगी भूमिकांमध्ये तो झळकला आहे.

टॅग्स :अनुप सोनीराज बब्बर