रॉक आॅन चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची ठरणार आहे. बऱ्याच दिवसांपासून ‘स्टोरी क्रेडिट’वरुन वादात अडकलेला रॉक आॅन 2 चा वाद आता सुटला आहे. चित्रपटाची लेखिका असलेस्या पुबाली चौधरीने चित्रपटाच्या ‘कथा श्रेयाचा’ वाद द फिल्म राईटर्स असोशिएशनच्या मदतीने सोडविण्यात आला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ‘रॉक आॅन 2’ च्या कथेचे सर्व श्रेय अभिषेक कपूरला देण्यात येणार आहे. त्यामुळे क्रेडिट गोज टु अभिषेक कपूर असे म्हणत लवकरच या चित्रपटाचे शुटिंग सुरु होणार आहे.
‘रॉक आॅन-2’ च्या कथेचे श्रेय अभिषेकला
By admin | Updated: February 13, 2015 23:31 IST