ज्युनियर बच्चन अर्थात अभिषेक लहानपणापासूनच बास्केटबॉल खेळाचा निस्सीम चाहता आहे. त्याच प्रेमापोटी अभिला अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू असलेल्या जॉन्सनला भेटण्याची इच्छा होती. नुकत्याच एका कार्यक्रमावेळी अभिषेक जॉन्सनला भेटला. त्याने त्याच्यासोबतचे आपले छायाचित्र टिष्ट्वटवर टाकले असून लहानपणापासूनचे आपले जॉन्सनला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. या वेळी जॉन्सनने त्याच्या स्वाक्षरी असलेल्या दोन जर्सीदेखील भेट दिल्या.
अभिषेक भेटला जॉन्सनला
By admin | Updated: February 26, 2015 23:18 IST