Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोज एक नवीन ड्रामा! एक्स गर्लफ्रेंड ईशा मालवीयबद्दल बोलताना अभिषेक कुमार भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 15:41 IST

'बिग बॉस'च्या प्रोमोमध्ये अभिषेक हा एक्स गर्लफ्रेंड ईशा मालवीयबद्दल बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस १७'मध्ये या रिएलिटी शोचं स्वरुप पूर्णपणे बदलण्यात आलं आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी एन्ट्री घेतली आहे. या शोमध्ये टीव्हीवरील एक्स कपलही सहभागी झालं आहे. अभिनेत्री ईशा मालवीय आणि अभिनेता अभिषेक कुमार यांनी 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. नुकतेच कार्यक्रमाचा एक  प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अभिषेक हा एक्स गर्लफ्रेंड ईशा मालवीयबद्दल बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

अभिषेकने मुन्नवर फारुकीसमोर आपल्या भावना मोकळ्या केल्या. व्हिडीओमध्ये तो म्हणतो, 'आमचं ब्रेकअप झालं आहे. पण, मला ती एवढी आवडते की मी तिच्याशी लग्न करायलाही तयार आहे.  'उडारियां' मालिकेच्या वेळेस तर मी तिच्या प्रेमात पागल झालो होतो. आमचं ब्रेकअप झालयं ही  गोष्ट स्वीकारू शकत नाही आणि त्यातून बाहेर पडू शकत नाही. आणि आता पण आमच्या नशिबानं आम्हाला पुन्हा इथे समोरा-समोर आणलं आहे. तिच्यापासून दूर राहिलं असं वचन मी घरी दिलं आहे. पण, आता मी सर्व कसं हाताळू हे काहीच मला कळत नाहीये'. 

बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच ईशा आणि अभिषेक स्टेजवरच भिडल्याचं पाहायला मिळालं होतं. स्टेजवरच त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. त्यांचं भांडण पाहून सलमान खानचीही बोलती बंद झाली होती. ईशाने अभिषेकवर गंभीर आरोप केले. शारीरिकरीत्या मारहाण केल्याचा आरोप ईशाने केला. यावर अभिषेकने उत्तर देत ईशावरही आरोप केले. यावर सलमानने या दोघांची कानउघाडणी केली होती.

 ईशा आणि अभिषेक 'उडारियां' या मालिकेमध्ये मध्ये होते आणि दोघांचं बाँडिंगही खूपच चांगलं होतं. शूटिंगदरम्यान ते एकत्र वेळ घालवत असत. मात्र, आता दोघांमध्ये सर्व काही ठिक नसल्याचं दिसून आलं. बिग बॉसच्या घरात लॉक झाल्यानंतर आता त्यांच्यात प्रेम फुलणार की नाही, हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. 

बिग बॉसचा हा सीझन खूपच रंगतदार होतोय. 'दिल-दिमाग और दम' अशी तिन घरं बिग बॉसमध्ये आहेत. 'बिग बॉस'चं घर हे कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि वनिता गरुड यांनी हे डिझाइन केलं आहे. शिवाय, यंदाची थीम ही कपल विरुद्ध सिंगल अशी आहे. काही कपल्स आणि काही सिंगल स्पर्धक बिग बॉस-17 मध्ये आहेत.  हा शो 4 महिने चालणार आहे.  पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आणि स्पर्धकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी बिग बॉस सज्ज आहे.  

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटी