Join us

आमीरच्या "दंगल"ची चीनमध्ये धूम, दोन दिवसात केली रेकॉर्ड कमाई

By admin | Updated: May 7, 2017 08:39 IST

"बाहुबली 2" हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता आमीर खानच्या दंगल चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - "बाहुबली 2" हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता आमीर खानच्या दंगल चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती. कमाईमध्ये सलमान खानच्या बजरंगी भाईजान चित्रपटावरही दंगलने मात केली होती. आमीर खानचा दंगल हा सिनेमा शुक्रवारी शेजारील चीनमध्ये प्रदर्शीत झाला.
 
चीनमध्ये पहिल्या दिवशीच दंगलने जवळपास 15 कोटींची कमाई केली होती तर दुस-या दिवशीही या सिनेमाने रग्गड कमाई केली. त्यामुळे या सिनेमाने जवळपास 40 कोटी कमावले आहेत. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांन ट्विटकरून याबाबत माहिती दिली.
 
दंगल हा सिनेमा चीनमध्ये 7000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. त्याचा चांगलाच फायदा या सिनेमाला झाला आहे. आमीरच्या "पीके" या सिनेमानेही चीनमध्ये 100 कोटी रूपये कमावले होते. त्यामुळे दंगलही चांगली कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दंगलने जगभरात 700 कोटी रूपये कमावले होते.