Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' मध्ये सलमान आणि शाहरूखच्या भूमिकांनी सगळे होतील अवाक्...

By अमित इंगोले | Updated: November 19, 2020 14:46 IST

'लाल सिंह चड्ढा' सिनेमात आमीर खान मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात सलमान खान आणि शाहरूख खान कॅमिओ भूमिकेत दिसतील.

आमीर खानचा आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा'बाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमात शाहरूख खान आणि सलमान खान दोघांचेही मजेदार रोल असणार आहे. त्यामुळे खान मंडळीच्या फॅन्सना या सिनेमातन तिप्पट आनंद मिळू शकतो.

'लाल सिंह चड्ढा' सिनेमात आमीर खान मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात सलमान खान आणि शाहरूख खान कॅमिओ भूमिकेत दिसतील. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, हा सिनेमा मिड ९०च्या बॅकड्रॉपवर तयार होणार आहे. शाहरूख या सिनेमात 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' तील राज मल्होत्राच्या भूमिकेत दिसेल. तर सलमान खानच्या भूमिकेबाबत अजून बोलणी सुरू आहे. अपेक्षा आहे की, यात सलमान खान प्रेमच्या भूमिकेत दिसेल. 

आधी करण-अर्जुनचा होता प्लॅन

सलमान खानने 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' सारख्या सिनेमात प्रेमच्या भूमिकेतून लोकांची मने जिंकली होती. आमीर खानला त्याच प्रेमला प्रेक्षकांसमोर आणायचं आहे. रिपोर्ट्सनुसार, आधी दोघांच्या करण-अर्जुन भूमिकांना समोर आणण्याचा प्लॅन सुरू होता. पण नंतर हा प्लॅन बदलला.

डिसेंबर २०२१ मध्ये रिलीज होईल 'लाल सिंह चड्ढा'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमात आमीरची भूमिका ५ दशकांमध्ये दाखवली जाणार आहे. प्रत्येक दशकातील आयकॉनिक मोमेंट्स स्क्रीनप्लेमध्ये टाकले जातील. यासाठी शाहरूख प्रॉस्थेटिक्स आणि व्हीएफएक्सने १९९५ सारखा तरूण दाखवला जाईल. या सिनेमात आमीरसोबत करिनाचीही मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा डिसेंबर २०२१ मध्ये रिलीज होणार आहे. 

टॅग्स :सलमान खानशाहरुख खानआमिर खान