Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा नवीन लूक होतोय व्हायरल, चाहत्यांची मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 07:00 IST

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा नवीन लूक चाहत्यांना भावतो आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. इतकेच नाही तर या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. या मालिकेत आई म्हणजेच अरुंधती देशमुखची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे. तिच्या कामाचे खूप कौतुक होताना दिसते. दरम्यान तिने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या फोटोंना पसंती मिळताना दिसते आहे.

मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. साडी आणि शॉर्ट हेअरमधील तिचे हे फोटो चाहत्यांना खूप भावताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतोना दिसतो आहे. 

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने या मालिकेपूर्वी 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही काम केले आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही ती झळकली आहे.

तिने 'आई कुठे काय करते' या मालिकेतून जवळपास १० वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक केले आहे. याबद्दल मधुराणीने मुलाखतीत सांगितले की, इतका मोठा ब्रेक घेण्यामागे कारणदेखील खास आहे. तिला ६ वर्षांची मुलगी आहे आणि तिच्या जन्मानंतर तिला वेळ देता यावा म्हणून तिने मोठा ब्रेक घेतला होता. आता तिला आई कुठे काय करते या मालिकेचा विषय आणि मांडणी आवडल्यामुळे मधुराणीने या मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका