Join us

२०१६ मध्ये दिग्गजांनाही करावा लागला फ्लॉपचा सामना

By admin | Updated: December 28, 2016 03:31 IST

बॉलिवूडमध्ये फ्लॉप-हिटचा सिलसिला सुरूच असतो. मात्र २०१६ हे वर्ष बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्सला धक्का देणारे ठरल्याने विशेष चर्चेत राहिले. मग त्यात बॉलिवूडचे महानायक

- Satish Dongare

बॉलिवूडमध्ये फ्लॉप-हिटचा सिलसिला सुरूच असतो. मात्र २०१६ हे वर्ष बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्सला धक्का देणारे ठरल्याने विशेष चर्चेत राहिले. मग त्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, फरहान अख्तर यांचा ‘वजीर’ असो वा हृतिक रोशन याचा ‘मोहेंजोदारो’ असो. या बड्या बॅनरच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारल्याने इंडस्ट्रीमध्ये हे वर्ष चर्चेत राहिले. अशाच २०१६ मधील काही टॉप टेन फ्लॉप चित्रपटांचा घेतलेला हा आढावा...वजीरवर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ८ जानेवारी २०१६ रोजी रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर यांचा ‘वजीर’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नाही. ४५ कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर केवळ ४१.२ कोटी रुपयांचाच गल्ला जमविला. या चित्रपटाचे दिग्दर्शन बिजॉय नांबियार यांनी केले आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी चेस ग्रॅँडमास्टरची भूमिका साकारली आहे, तर फरहान अ‍ॅण्टी टेरिझम स्कॉड (एटीएस) आॅफिसरच्या भूमिकेत आहे. फितूरकतरिना कैफ, आदित्य राय कपूर आणि तब्बू स्टार ‘फितूर’ हा चित्रपट १२ फेब्रुवारीला रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटापासून निर्मात्यांना बऱ्याचशा अपेक्षा होत्या. कारण ५५ कोटी रुपये खर्च करून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट निम्मा खर्चही गोळा करू शकला नाही. केवळ २०.०७ कोटी रुपयांचाच गल्ला जमविण्यात चित्रपटाला यश आले. हा चित्रपट चार्ल्स डिकेन्स यांच्या ‘ग्रेट एक्सपेक्टेशन्स’ या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाची कथा एका काश्मिरी मुलाची असून, त्याला काश्मीरमधीलच एका श्रीमंत कुटुंबातील मुलीशी प्रेम होते. ग्रेट ग्रॅण्ड मस्ती‘मस्ती’ सिरीजचा तिसरा भाग म्हणजेच ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ या चित्रपटातून आॅनस्क्रीनवर अश्लीलतेचे सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. हॉट अ‍ॅण्ड बोल्ड फॉर्म्युला असलेला हा चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या अजिबात पचनी पडला नाही. ३२ करोड खर्च करून बनविलेला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर केवळ १३ कोटी रुपयांचाच गल्ला जमवू शकला. सुरुवातीला हा चित्रपट २२ जुलै रोजी रिलीज केला जाणार होता. मात्र चित्रपटाची प्रिंट आॅनलाइन लिक झाल्याने निर्मात्यांनी १५ जुलै रोजीच चित्रपट रिलीज केला. चित्रपटात रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय, अफताब शिवदासानी आणि उर्वशी रौतेला यांच्या भूमिका आहेत. मोहेंजोदारोबॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी ओळख असलेला हृतिक रोशन आणि पूजा हेगडे अभिनित ‘मोहेंजोदारो’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात फ्लॉप चित्रपट म्हणून समोर आला आहे. आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट इंड्स व्हॅली सिव्हिलायजेशन आणि मोहेंजोदारो या शहरांच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेल्या ऐतिहासिक सेट्स डोळे दीपवणारे आहेत. त्यामुळेच चित्रपटाला तब्बल १२० कोटी रुपये खर्च आला आहे. मात्र असे असतानाही प्रेक्षकांनी हा चित्रपट नाकारला. चित्रपटाने केवळ ५९ कोटी रुपयांचीच कमाई केली. रॉकी हॅँडसमजॉन अब्राहम याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रॉकी हॅँडसम’ या चित्रपटापासून निर्मात्यांपेक्षा जॉनलाच अधिक अपेक्षा होत्या. हा चित्रपट आपल्या करिअरला कलाटणी देईल, असे तो चित्रपटाच्या प्रमोशनवेळी बोलत होता. हा चित्रपट २५ मार्च रोजी रिलीज झाला होता. चित्रपटासाठी तब्बल ४२ कोटी रुपये खर्च आला होता. मात्र बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने केवळ २६.४१ कोटी रुपयांचाच गल्ला जमविला. हा चित्रपट २०१० मध्ये रिलीज झालेल्या कोरियन फिल्म ‘द मॅन फ्रॉम नोवेयर’चा आॅफिशियल अ‍ॅडॅप्शन आहे. अझहरभारतीय क्रिकेट संघाचा कॉन्ट्रोव्हर्शल कर्णधार ठरलेला मोहम्मद अझहरुद्दीन याच्या जीवनावर आधारित ‘अझहर’ हा चित्रपट फॅन्सची मने जिंकण्यात फारसा यशस्वी ठरला नाही. ‘अझहर’ हा फॅक्टर्स असतानाही चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल अपयशी ठरल्याने निर्मात्यांना याचा मोठा धक्का बसला. ४० कोटी रुपये खर्चून बनविलेला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर केवळ ३३ कोटी रुपयांचीच कमाई करू शकला. चित्रपटात इमरान हाश्मी याची प्रमुख भूमिका असून, अझहरुद्दीनची आॅन स्क्रीन लव्ह स्टोरी दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इमरानसोबत प्राची देसाई आणि नर्गिस फाखरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. राज रिबूटराज सिरीजच्या आतापर्यंतच्या सर्वच चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. मात्र या सिरीजच्या चौथ्या ‘राज रिबूट’ला मात्र प्रेक्षकांची मने जिंकता आली नाहीत. १६ डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले होते. चित्रपटात इमरान हाश्मी, कृती खरबंदा आणि गौरव अरोड प्रमुख भूमिकेत आहेत. ४० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला हा चित्रपट केवळ २९ कोटी रुपयांचाच गल्ला जमवू शकला. मिर्झियाहर्षवर्धन कपूर आणि सयामी खेर या स्टारपुत्रांचा डेब्यू असलेला ‘मिर्झिया’ हा चित्रपट सिनेमागृहामध्ये केव्हा आला अन केव्हा गेला हे समजलेच नाही. एपिक मिर्झा साहिबा यांच्या लव्ह स्टोरीवर आधारित असलेला हा चित्रपट ७ आॅक्टोबर रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटापासून बऱ्याचशा अपेक्षा होत्या. ४५ कोटी रुपये खर्चून बनविलेल्या या चित्रपटातील भव्य सेट्स डोळे दीपवणारे होते. मात्र या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फक्त ११ कोटी रुपयांचाच गल्ला जमविला.