Join us
Daily Top 2Weekly Top 5

Zomato चे शेअर्स २१ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर, असं काय झालं की स्टॉकनं घेतली झेप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 15:30 IST

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या (Zomato Share) शेअर्समध्ये वाढीचं सत्र सातत्यानं सुरू आहे.

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या (Zomato Share) शेअर्समध्ये वाढीचं सत्र सातत्यानं सुरू आहे. कंपनीच्या शेअर्सनं सोमवारी सुमारे 5 टक्क्यांच्या वाढीसह 121.95 रुपयांची पातळी गाठली. हा कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. तसंच झोमॅटोच्या शेअर्सची ही पातळी 21 महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. सोमवारी कामकाजाच्या सुरूवातीला कंपनीचे शेअर्स 119.60 रुपयांच्या पातळीवर उघडले.झोमॅटोच्या शेअर्समधील तेजीचं कारण कंपनीचे तिमाही निकाल असल्याचं म्हटलं जात आहे. कंपनीला या तिमाहीत देखील नफा झाला आहे. परंतु वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीला तोटा सहन करावा लागला होता.130 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता"आतापर्यंत स्टॉक बुलिश आहे. येणाऱ्या काळात शेअर 130 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर सपोर्ट प्राईज 115 रुपयांची पातळीपर्यंत राहू शकते," अशी प्रतिक्रिया ब्रोकरेज फर्म एंजल वनशी निगडीत तज्ज्ञ राजेश भोसले यांनी दिली.तिमाही निकालांनी चित्र बदललंकंपनीनं दिलेल्या माहितीनुसार झोमॅटोचं नेट प्रॉफिट सप्टेंबर तिमाहीत 36 कोटी रुपये राहिलं आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 251 रुपयांचा तोटा झाला होता. जुलै सप्टेंबर 2022 दरम्यान झोमॅटोचा महसूल 2848 कोटी रुपये राहिला. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसूलात 72 टक्क्यांची वाढ दिसून आली.

टॅग्स :झोमॅटोशेअर बाजार