Join us

Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 10:43 IST

Zomato Share Price Target : भारतीय शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच आहे. मात्र, त्यानंतरही ब्रोकरेज कंपन्या काही शेअर्सबाबत सकारात्मक आहेत.

Zomato Share Price Target : भारतीय शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच आहे. मात्र, त्यानंतरही ब्रोकरेज कंपन्या काही शेअर्सबाबत सकारात्मक आहेत. यातील एक शेअर म्हणजे झोमॅटो (Zomato Target Price). जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीनं या शेअरवर आपलं ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवलं आहे.

ब्रोकरेजनं शेअरची टार्गेट प्राईजही २७८ रुपयांवरून ३५५ रुपये केली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येत्या तीन ते चार वर्षांत झोमॅटोच्या एका शेअरची किंमत (Zomato Share Price) आजच्या तुलनेत दुप्पट होईल, असा मॉर्गन स्टॅनलीचा अंदाज आहे. म्हणजेच २७० चा शेअर ५०० च्या पुढे जाईल.

मॉर्गन स्टॅनलीच्या रिपोर्टमध्ये काय?

भारताच्या किरकोळ बाजारपेठेतील क्विक कॉमर्सचा वाढता हिस्सा, फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्समधील मजबूत अंमलबजावणी, डीप बॅलन्सशीट आणि २०३० पर्यंत मोठ्या नफ्याची शक्यता यामुळे मॉर्गन स्टॅनलीनं झोमॅटोला ओव्हरवेट रेटिंग दिलं आहे.

एक वर्षाचा परतावा १२८ टक्के

झोमॅटो हा मल्टीबॅगर शेअर असून त्यानं वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना १२८ टक्के परतावा दिला आहे. २० नोव्हेंबर २०२३ रोजी शेअरचा भाव ११८.१५ रुपये होता. तर, गुरुवार, १४ नोव्हेंबर २०२४ रोजी बाजार बंद झाला तेव्हा झोमॅटोच्या एका शेअरची किंमत २७० रुपये होती. तज्ज्ञांच्या मते, या तेजीमागचं कारण जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीचा १३ नोव्हेंबर २०२४ चा रिपोर्ट आणि झोमॅटोचे एफ अँड ओमध्ये सामील होणं हे होते.

मॅक्वेरीनं काय म्हटलंय?

एकीककडे मॉर्गन स्टॅनलीनं झोमॅटोवरील ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवलंय तर दुसरीजे ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीनं झोमॅटोला १३० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह अंडरपरफॉर्म रेटिंग दिलंय. मॅक्वेरीनुसार झोमॅटोच्या शेअर्समध्ये ५० टक्क्यांपर्यंतच्या घसरणीची शक्यता आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :झोमॅटोशेअर बाजारगुंतवणूक