Defence Stock: शेअर बाजारात मंगळवारी घसरणीचे वातावरण दिसून आलं. गुंतवणूकदार उच्च पातळीवरून प्रॉफिट बुकींग झालं. बँकिंग, आयटी क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग दिसून आले. निफ्टीत मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. दरम्यान, संरक्षण क्षेत्रातील शेअरमध्ये मात्र मोठी खरेदी झाली.
शेअर बाजारात मंगळवारी घसरण पाहायला मिळत असली तरी निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्समध्ये ४.३५ टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. डिफेन्स शेअरमध्ये BDL ९.४० टक्क्यांनी वधारला आहे. एचएएल, बीईएमएल, भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक वधारलेत.
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी कारवाया थांबल्यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात "मेड इन इंडिया" संरक्षण उपकरणांचा आग्रह धरला. त्यानंतर मंगळवारी संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये ७% पर्यंत वाढ झाली. २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर मोदींनी लष्करी क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवण्याच्या गरजेवर भर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढविण्यावर भर दिल्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्सचा (बीईएल) शेअर मंगळवारी कामकाजादरम्यान ४.५ टक्क्यांनी वधारून ३३७.३० रुपयांवर पोहोचला. तर भारत डायनॅमिक्सच्या शेअरची किंमत ७.८ टक्क्यांनी वाढून १,६९२.३५ रुपयांवर पोहोचली. हिंदुस्थान एरोनॉटिक्सचा शेअर ४ टक्के तर माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर ४ टक्क्यांनी वधारला.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)