Western Overseas Study Abroad IPO: जेव्हा गुंतवणूकदार एखाद्या कंपनीच्या आयपीओमध्ये (IPO) गुंतवणूक करतात, तेव्हा त्यांची इच्छा असते की त्यातून मोठा नफा कमवावा. मात्र, वेस्टर्न ओवरसीज स्टडी अब्रॉड आयपीओनं (Western Overseas Study Abroad IPO) गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का दिला आहे. खराब सुरुवातीमुळे गुंतवणूकदारांना पहिल्या दिवशी नुकसान सहन करावं लागलं.
कंपनीचे शेअर्स बीएसीई एसएमईमध्ये ५४.९० रुपयांच्या पातळीवर उघडले होते. कामकाजादरम्यान कंपनीच्या शेअर्सचा भाव सुमारे ७ टक्क्यांनी घसरून ५२.१६ रुपयांवर आला.
यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
आयपीओचा तपशील
वेस्टर्न ओवरसीज स्टडी आयपीओ हा एसएमई सेगमेंटचा आयपीओ होता. कंपनीच्या आयपीओचा प्राईस बँड ५६ रुपये होता. कंपनीनं २००० शेअर्सचा एक लॉट बनवला होता, परंतु कोणत्याही किरकोळ गुंतवणूकदाराला (Retail Investor) किमान ४००० शेअर्ससाठी गुंतवणूक करावी लागणार होती. त्यामुळे, गुंतवणूकदारांना किमान २,२४,००० रुपये गुंतवावे लागले. हा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ४ डिसेंबर रोजी उघडला होता आणि गुंतवणूकदारांना ८ डिसेंबर २०२५ पर्यंत गुंतवणूक करता आली. आयपीओ पूर्वी कंपनीचे मार्केट कॅप ३३.६७ कोटी रुपये होते, जे लिस्टिंगनंतर घसरून ३१.३६ कोटी रुपये झालं आहे.
सबस्क्रिप्शन किती झाले?
वेस्टर्न ओवरसीज स्टडी अब्रॉड आयपीओला तीन दिवसांत १.४१ पट सबस्क्राइब करण्यात आलं होतं. किरकोळ श्रेणीत आयपीओला २.४३ पट आणि एनआयआय (NII) श्रेणीत आयपीओला ०.३९ पट सबस्क्रिप्शन मिळालं. या आयपीओचा आकार १०.०७ कोटी रुपये होता. कंपनीनं आयपीओद्वारे १०.०७ कोटी शेअर्स जारी केले आहेत. विद्यमान गुंतवणूकदारांनी आयपीओद्वारे कोणत्याही शेअर्सची विक्री केलेली नाही.
कंपनी काय करते?
२०१३ मध्ये सुरू झालेली ही कंपनी लोकांना इमिग्रेशन आणि एज्युकेशन सल्ला देते. यासोबतच कंपनी व्हिसा सेवांशी संबंधित सल्ला देखील देते. कंपनी TOEFL सह फ्रेंच, जर्मन इत्यादी भाषा शिकवते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Western Overseas Study Abroad IPO disappointed investors on its debut, opening lower and hitting a 7% drop to ₹52.16. Subscribed 1.41 times, the SME IPO's poor performance caused early losses for investors. The IPO price was ₹56.
Web Summary : वेस्टर्न ओवरसीज स्टडी अब्रॉड आईपीओ की शुरुआत निवेशकों के लिए निराशाजनक रही, जो कम पर खुला और 7% गिरकर ₹52.16 पर आ गया। 1.41 गुना सब्सक्राइब किए गए, एसएमई आईपीओ के खराब प्रदर्शन के कारण निवेशकों को शुरुआती नुकसान हुआ। आईपीओ मूल्य ₹56 था।