Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्या रविवारीही शेअर बाजार खुला राहणार, स्वतंत्र भारतात दुसऱ्यांदाच होणार असं; अर्थसंकल्पावर सामान्यांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 14:09 IST

Budget 2026: उद्या रविवार, १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६' च्या निमित्तानं रविवारी सुटी असूनही शेअर बाजार सामान्य दिवसांप्रमाणे सुरू राहणार आहे.

Budget 2026: उद्या रविवार, १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६' च्या निमित्तानं रविवारी सुटी असूनही शेअर बाजार सामान्य दिवसांप्रमाणे सुरू राहणार आहे. स्टॉक एक्सचेंजनं १ फेब्रुवारी रोजी बाजार सुरू राहण्याबाबत माहिती दिली आहे. 

स्वतंत्र भारताच्या इतिहासात ही दुसरी वेळ असेल जेव्हा रविवारी शेअर बाजारात व्यवहार होतील. यापूर्वी २८ फेब्रुवारी १९९९ रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात रविवारी बाजार उघडला होता. शेअर बाजाराचे 'प्री-सेशन' सकाळी ९ वाजता सुरू होईल, तर सामान्य बाजार ९:१५ ते ३:३० वाजेपर्यंत सुरू राहील.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सलग ९ वं बजेट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२६ रोजी सलग ९ व्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. सकाळी ११ वाजता लोकसभेत त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू होईल. गेल्या १५ वर्षांतील आकडेवारी पाहता, बजेटच्या दिवशी शेअर बाजाराची स्थिती फारशी चांगली नसते; मात्र त्यानंतरच्या आठवड्यात मोठी तेजी पाहायला मिळते. जुनी आकडेवारी सांगते की, प्री-बजेट आठवड्यात निफ्टी सरासरी ०.५२ टक्क्यांनी खाली येतो, तर बजेटच्या दिवशी 'निफ्टी बँक'मध्ये सरासरी तेजी दिसून येते.

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे आणि अपेक्षा

सामान्य माणसापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पावर खिळल्या आहेत. सरकार आगामी एका वर्षात काय करणार आहे, याचा अंदाज बजेटवरून येतो, म्हणूनच याची प्रतिक्रिया शेअर बाजारावरही उमटते. यावेळेस पुन्हा एकदा सरकारचे लक्ष 'कॅपिटल एक्स्पेंडिचर'वर (भांडवली खर्च) असू शकते. दुसरीकडे, इन्कम टॅक्स नवी सवलत मिळण्याची शक्यता कमी आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकार लोकप्रिय घोषणा करण्याऐवजी अर्थव्यवस्थेवर जास्त भर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Share Market Open Sunday for Budget; Second Time Ever in India

Web Summary : Share market will remain open this Sunday for the budget presentation, a rare occurrence. Nirmala Sitharaman will present her ninth consecutive budget. Focus is expected on capital expenditure, with limited income tax relief anticipated. Historically, budget day sees mixed market performance.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकनिर्मला सीतारामनअर्थसंकल्प २०२६